sambhaji brigade works for maratha youth`s upliftment : Gaykwad | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

मराठा तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संभाजी ब्रिगेड प्रयत्नशील : गायकवाड

उमेश घोंगडे
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

पुणे : रोजगार, स्वयंरोजगाराच्या माध्यमातूनच मराठा युवकांचे खऱ्या अर्थाने अर्थिक सक्षमीकरण शक्‍य आहे, असा विचार संभाजी ब्रिगेडच्या नवव्या अधिवेशनात प्रकर्षाने मांडण्यात आला. यापुढील काळात या विषयावर संघटना रचनात्मक काम करील. सामाजिक काम करणाऱ्या संघटनेची गरज असून याच भूमिकेतून संभाजी ब्रिगेड यापुढे काम करीत राहील, असे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सांगितले. 

पुणे : रोजगार, स्वयंरोजगाराच्या माध्यमातूनच मराठा युवकांचे खऱ्या अर्थाने अर्थिक सक्षमीकरण शक्‍य आहे, असा विचार संभाजी ब्रिगेडच्या नवव्या अधिवेशनात प्रकर्षाने मांडण्यात आला. यापुढील काळात या विषयावर संघटना रचनात्मक काम करील. सामाजिक काम करणाऱ्या संघटनेची गरज असून याच भूमिकेतून संभाजी ब्रिगेड यापुढे काम करीत राहील, असे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सांगितले. 

ब्रिगेडचे दोन दिवसीय अधिवेशन नुकतेच अलिबाग येथे झाले. अधिवेशनाला राज्यभरातून हजारो युवक उपस्थित होते. कोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे, गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचे युवक नेते हार्दीक पटेल, आमदार जितेंद्र आव्हाड, धमेंद्र पवार, राहुल खामगळ, राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, रोहित पवार यांच्यासह विविध वक्‍त्यांनी दोन दिवसातील चर्चासत्राच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

जागतिक शांतता, नव्याने विकसित होणारे तंत्रज्ञान आणि देशाच्या सरहद्दी ओलांडून विचार करणारी "सिमलेस' भूमिका ही येत्या काळाची गरज आहे. मराठा युवकांना या साऱ्या भूमिका पटवून देत त्यांची मानसिकता तयार करण्यासाठी संघटना काम करीत राहील, असे गायकवाड यांनी सांगितले.

संभाजी ब्रिगेडचे काम 28 देशात चालते. या अधिवेशनाला दुबईतून सहा, ऑस्टेलियातून दोन तर इंग्लडमधून एक प्रतिनिधी उपस्थिती होते. समाजासाठी काम करणाऱ्या श्रीमंत कोकाटे, जयश्री शेळके, प्रदीपदादा सोळुंके, ऍड. समीर घाटगे, अजयसिंह सावंत, ज्ञानेश्‍वर मोळक, बंडू मोरे तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या यशवंत गोसावी यांना मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

रायगडसह अन्य प्रमुख नऊ किल्ल्यांच्या पूर्नबांधणीसाठी मी प्रयत्नशील असून खासदारकीच्या माध्यमातून हे काम मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न राहील, असे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या अधिवेशनात बोलताना सांगितले. मराठा युवकांनी जागतिक पातळीवर स्पर्धा करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे मत रोहीत पवार यांनी व्यक्त केले. खऱ्या अर्थाने तरूणांचे अर्थिक सक्षमीकरण व्हायचे असेल तर सहकार, सरकार व खासगी उद्योग या तीन घटकांच्या माध्यमातून होऊ शकते, असे पवार यांनी स्पष्ट केले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख