sambhaji brigade session in alibag hardik patel | Sarkarnama

चुकीचा इतिहास सांगून चुकीचे लोक सत्तेत आले, हार्दीक पटेलांचा हल्लाबोल 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

अलिबाग (जि. रायगड) : छत्रपती शिवाजी महाराज, लोह पुरुष सरदार पटेल यांचा चुकीचा इतिहास सांगून चुकीचे लोक सत्तेत बसले आहेत. ते बहुजन, कष्टकरी समाजाचे आर्थिक शोषण करीत आहेत. जे स्वार्थी लोक सत्तेवर बसले आहेत त्यांना खाली खेचणे गरजेचे आहे. यासाठी मतभेद विसरून बहुजन समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचे मत गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी व्यक्त केले. 

राफेल घोटाळा, आरक्षण, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आदी मुद्दे उपस्थित करून हार्दीक यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. 

संभाजी ब्रिगेडचे 9 वे राज्यस्तरीय अधिवेशन आजपासून अलिबागमध्ये सुरू झाले आहे. यावेळी हार्दिक पटेल बोलत होते. 

"" आरक्षणावरुन जे सध्या राजकारण सुरू आहे, त्यास सरकारच जबाबदार आहे. मराठा समाजाने 52 आंदोलने शांततेच्या मार्गानी केली तरीही सरकारने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. मराठा, धनगर समाज आरक्षण का मागत आहेत ? याबाबत कोणी विचारच करत नाही. विदर्भ, मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. कष्टकऱ्यांवरील होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही पटेल यांनी केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जातीपातीचे राजकारण बाजूला ठेवून बहुजन समाजाने एकत्र येण्याची गरज स्पष्ट केले. संभाजी ब्रिगेड ही संघटना पुरोगामी विचार जपण्याचे काम करीत असून जातीयवादी शक्तींना ठेचण्याचे काम करीत आहे, असेही ते म्हणाले. 

अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष शेकापचे ज्येष्ठ नेते,आमदार जयंत पाटील म्हणाले, "" पुढील काळात शाहू, आंबेडकर, जिजाऊ यांना माननाऱ्या बहुजन समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे. भरकटलेल्या तरुणांना योग्य दिशा देण्याची गरज आहे.'' 

दोन दिवस चालणाऱ्या या आधिवेशनास आमदार पंडित पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक आदी उपस्थित होते. संभाजी ब्रिेगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यासह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येन उपस्थित आहेत. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख