आजचा वाढदिवस : संभाजी पाटील निलंगेकर- कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य  - sambaji patil nilangekar birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आजचा वाढदिवस : संभाजी पाटील निलंगेकर- कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 20 जून 2018

औरंगाबाद : राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना आजोबा माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, वडील स्व. दिलीपराव पाटील निलंगेकर आई माजी खासदार रुपाताई निलंगेकर यांच्याकडून संभाजी पाटील यांना राजकीय वारसा मिळाला. 

भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते सदस्य होते.भाजयुमोचे अध्यक्ष आणि भाजपचे महासचिव म्हणून देखील कार्यरत होते. 2004-2009 च्या विधानसभा निवडणुकीत संभाजी पाटील यांनी आजोबा शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पराभव केला होता. पुन्हा 2014 मध्ये ते याच मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले. 

लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर कॉंग्रेसच्या ताब्यात असलेली महानगर पालिका आणि जिल्हा परिषद त्यांनी ताब्यात घेतली. तत्पूर्वी 2016 मध्ये राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांचा कामगार व कौशल्य विकास मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख