`ओबीसी' जनगणनेसाठी समता परिषदेचा खासदार गोडसे, भारती पवारांकडे आग्रह

देशात 2021 मध्ये नव्याने जनगणना होणार आहे. त्यात जातनिहाय जनगणनेसाठी नाशिकच्या खासदारांनी संसदेत आपली भूमिका मांडवी यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नाशिक लोकसभा सदस्य खासदार हेमंत गोडसे, दिंडोरी लोकसभा सदस्य डॉ. भारती पवार यांना निवेदन दिले आहे.
samata parishad wants obc census
samata parishad wants obc census

नाशिक - देशात 2021 मध्ये नव्याने जनगणना होणार आहे. त्यात जातनिहाय जनगणनेसाठी नाशिकच्या खासदारांनी संसदेत आपली भूमिका मांडवी यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नाशिक लोकसभा सदस्य खासदार हेमंत गोडसे, दिंडोरी लोकसभा सदस्य डॉ. भारती पवार यांना निवेदन दिले आहे.

खासदारांना दिलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे नाशिकचे कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

समता परिषदेच्या निवेदनात म्हटले आहे की, समता परिषदेचे संस्थापक, अध्यक्ष छगन भुजबळ हे 1992 पासून `ओबीसीं'ची जातवार जनगणना व्हावी यासाठी सातत्याने आंदोलन, सभा, संमेलने आणि मेळाव्यातून हा विषय मांडत आहेत. ओबीसींची जातीवार जनगणना झाल्याशिवाय ओबीसींची नक्की आकडेवारी, त्यांची स्थिती माहित होणार नाही. संपूर्ण ओबीसी समाज जणगणनेअभावी, त्यांच्या राष्ट्रीय विकासापासून वंचित राहिलेला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा ओबीसींच्या न्यायाचा आणि आरक्षणाचा प्रश्न आला. त्या-त्या वेळी ओबीसींची नक्की लोकसंख्या व स्थिती विचारली. पण केंद्र सरकार कधीही त्याचे उत्तर देवू शकले नाही. त्यामुळे ओबीसींची जनगणना करणे अत्यंत आवश्‍यक असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार ओबीसींची जातवार जनगणना करणार असे जाहीर केले होते. आता ओबीसी जनगणनेचे काम सुरु झाले आहे. त्याची राज्यात प्रशिक्षण शिबिरे सुरु आहेत. लवकरच जनगणना प्रबंधक घरोघरी जाऊन जणगणनेची माहिती घेणार आहेत. परंतु या जनगणना फॉर्ममध्ये ओबीसींच्या जातवार जणगणनेच कॉलमच नाही. मा.पंतप्रधानांनी ओबीसींच्या जणगणनेची जाहीर घोषणा करूनही, ओबीसींच्या जातवार जणगणनेला वगळले आहे.

नाशिक जिल्ह्यातील लोकसभा सदस्यांनी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करावा. जनगणना फॉर्ममध्ये ओबीसी जातवार कॉलम टाकण्याबाबत आपल्या मतदार क्षेत्रातील ओबीसी जनतेच्या वतीने मागणी करावी.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com