samarjitsinh ghatge criticize sanjay raut | Sarkarnama

संजय राऊतांनी छत्रपती घराण्याची माफी मागावी : समरजितसिंह घाटगे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

खासदार संजय राऊत यांनी स्वप्रतिष्ठेसाठी अशी विधाने करू नयेत. आपल्या जिभेला लगाम घालावा.

कागल (कोल्हापूर) : उदयनराजे भोसले हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत, हे अख्खा महाराष्ट्र जाणतो, तरीही खासदार संजय राऊत हे उदयनराजे यांचेकडे वंशज असल्याचे पुरावे मागितले. संजय राऊत यांचे हे वक्तव्य उद्धटपणाचे असून साताऱ्याच्या गादीचा अपमान करणारे आहे, अशी टीका छत्रपती शाहू जनक घराण्याचे वारसदार समरजितसिंह घाटगे यांनी केली आहे.

श्री घाटगे म्हणाले, खासदार संजय राऊत यांनी स्वप्रतिष्ठेसाठी अशी विधाने करू नयेत. आपल्या जिभेला लगाम घालावा, अन्यथा त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील समस्त राजपरिवार आणि मराठी माणूस रस्त्यावर येईल. त्यांच्या विधानाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील जनतेची मान शरमेने खाली गेली आहे. अशाप्रकारच्या खालच्या दर्जाचे विधान करणे हे उद्दामपणाचे लक्षण असून त्यांनी आपले वक्तव्य मागे घावे. 

ते म्हणाले, राऊत यांनी आपल्या जिभेवर आवर घालावा. मराठी माणूस कधीच हा अपमान सहन करणार नाही. त्यांनी समस्त छत्रपती घराण्याची माफी मागावी अन्यथा पुढील परिणामास सामोरे जावे लागेल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख