samarjitsinh ghatge on assembly result | Sarkarnama

मी शंभर टक्के आमदार झालो असे समजा : समरजितसिंह

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

कागलच्या प्रकल्पामध्ये 687 घरे बांधण्यात येणार आहेत

कागल (कोल्हापूर) : म्हाडाचा कागलचा घरकूल प्रकल्प हा कमीतकमी दराचा आणि चांगल्या दर्जाचा प्रकल्प व्हायला हवा. या कामात कोणताही हस्तक्षेप होणार नाही. म्हाडाच्या भविष्यातील अध्यक्षांनीही हा घरकूल प्रकल्प बघायला येतील असे काम या ठिकाणी करु, असे प्रतिपादन म्हाडा (पुणे)चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. 

म्हाडा (पुणे) यांच्यामार्फत कागलमध्ये बांधण्यात येणाऱ्या घरकुलांचा भूमीपूजन समारंभ अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्याहस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर म्हाडा (पुणे)चे मुख्य अधिकारी अशोक पाटील, उपअभियंता सनिल ननवरे, नायब तहसिलदार शिवाजीराव गवळी, मुख्याधिकारी पंडीत पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

समरजितसिंह घाटगे म्हणाले, सत्ता नसलेल्या कसबा सांगावसारख्या गावासाठी पेयजल योजना मी मंजूर करुन आणली आहे. विरोधकांनी माझ्यावर अशीच टिकाटिप्पणी करावी म्हणजे मी शंभर टक्के आमदार झालो असे समजा. 

ते म्हणाले, झोपडपट्टी नियमितीकरणाचा शासन निर्णय झालेलाच आहे. त्याअंतर्गत कागल शहरात 11 वसाहती आहेत. संबंधित सर्वांनी आपली कागदपत्रे मुख्याधिकाऱ्यांकडे जमा करावीत. आचारसंहिता लागू झाली तरी हे काम सुरु राहणार आहे. आता कोणीही तुमच्या घरावर बुलडोझर फिरवणार नाही. कागदपत्रे जमा करा तुम्ही तुमच्या घराचे मालक झालेले आहोत.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख