घरात निरागस क्षणांचा शोध घ्या; लॉकडाऊन संपला की परत हे क्षण गवसणार नाहीत - समरजीतसिंह घाटगे

म्हाडाचे माजी सभापती आणि कागलमधील शाहू ग्रुपचे चेअरमन समरजीतसिंह घाटगे यांनी आज सकाळी व्यायाम करतानाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे आणि त्याचबरोबर घरातील निरागस क्षणांचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे.
samarjeetsinh ghatge appeals people to search happy moments during lockdown 
samarjeetsinh ghatge appeals people to search happy moments during lockdown 

पुणे- म्हाडाचे माजी सभापती आणि कागलमधील शाहू ग्रुपचे चेअरमन समरजीतसिंह घाटगे यांनी आज सकाळी व्यायाम करतानाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे आणि त्याचबरोबर घरातील निरागस क्षणांचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे. 

एक मिनिटांच्या व्हिडिओमध्ये ते ट्रेड मिलवर धावत आहेत. या व्हिडिओ शेअर करताना त्यांनी म्हटले आहे, की मी नेमाने व्यायाम करतो आणि त्याचा मला अभिमान आहे. पण व्यायाम करतांना आता मिळलेला हा निरागासपणाचा अनुभव आज इथे सर्वांसोबत एका खास कारणासाठी शेअर करत आहे. घरात थांबून कंटाळा आल्याचे अनेक फॉरवर्ड मेसेज माझ्या सध्या वाचनात येत आहेत. 

माझं सगळ्यांना एक सांगणं आहे, आपल्या घरात अशा निरागस क्षणांचा शोध घ्या. एकदा का हा लॉक डाऊन संपला की परत धावपळ, दगदग, जगण्याची लढाई यात हे क्षण गवसणार नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

या संकटकाळात समाजाप्रति माझे असलेले कर्तव्य पूर्ण करत असतानाच लॉक डाऊनमुळे घरात असल्याने थोडा वेळ का होईना पण स्वतःसोबत, परिवारासोबत मिळत आहे. तुम्हीही ह्या दिवसात घरातच थांबून परिवारासोबत कशा प्रकारे चांगले क्षण, अविस्मरणीय आठवणी घडवू शकाल याचा विचार करा आणि ते पूर्णपणे जगा, असा सल्ला घाटगे यांनी त्यांच्या चाहत्यांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com