samajwadi party nashik president imran choudhary enters into bjp | Sarkarnama

समाजवादी पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष इम्रान चौधरी समर्थकांसह भाजपात 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 6 जुलै 2019

नाशिक : समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष इम्रान चौधरी यांनी पालकमंत्री गिरीश महाजन आणि आ. देवयानी फरांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. 

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर हा प्रवेश सोहळा झाल्याने भाजपला त्याचा लाभ होणार आहे. आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नांनी हा प्रवेश झाला आहे. 

इम्रान चौधरी यांच्या भाजपा प्रवेशाने नाशकात आणि विशेषतः जुन्या नाशकात भाजपाची स्थिती अधिक मजबूत होणार असल्याचे आ.देवयानी फरांदे यांनी सांगितले. 

नाशकात भाजपाच्या लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचवा असे सांगून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी इम्रान चौधरी यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल स्वागत करून त्यांचा सत्कार केला. भाजपाची विचारधारा पटल्याने आपण या पक्षात प्रवेश केला असून नाशकात पक्षवाढीसाठी प्रयत्न करू, असे चौधरी यांनी सांगितले.

यावेळी वसीउल्लाह चौधरी, हाशिम वार्सी, सलमान खान, बादशाह खान,नसीम चौधरी, मुबारक खान, इम्रानखान यांनीही भाजपात प्रवेश केला. प्रवेश सोहोळयाच्यावेळी पप्पू शेख, अस्लम कुरेशी, संदीप दीक्षित आदी उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख