सलील देशमुख मेटपांजरातून लढणार; चंद्रशेखर चिखले यांचे बंड शमले?

काटोलचे आमदार अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी मेटपांजरा सर्कलमधून जिल्हा परिषद निवडणूक लढणार आहेत. येथून राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी दिली नसल्याने माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी बंड पुकारले होते. त्यांचे बंड शमविण्यात तसेच डॉ. वैशाली जयंत टालाटुले यांचीही समजूत घालण्यात देशमुखांना यश आले आहे. ते निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे कळते.
सलील देशमुख मेटपांजरातून लढणार; चंद्रशेखर चिखले यांचे बंड शमले?

नागपूर : काटोलचे आमदार अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी मेटपांजरा सर्कलमधून जिल्हा परिषद निवडणूक लढणार आहेत. येथून राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी दिली नसल्याने माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी बंड पुकारले होते. त्यांचे बंड शमविण्यात तसेच डॉ. वैशाली जयंत टालाटुले यांचीही समजूत घालण्यात देशमुखांना यश आले आहे. ते निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे कळते.

राज्याच्या विधिमंडळात पोहचण्यास इच्छुक असलेल्या सलील देशमुख यांनी वडील अनिल देशमुख यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात येण्याचा निश्‍चय केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात ते उतरणार असल्याचे जाहीर केले. यानंतर त्यांनी येनवा, पारडसिंगा व मेटपांजरा हे तीन सर्कल निवडले होते. पारडसिंगा सर्कलमध्ये अडचण होण्याची शक्‍यता असल्याने त्यांनी येनवाची निवड केली. येनवा सर्कलमधूनच सलील यांचे वडील अनिल देशमुख यांनी जिल्हा परिषदेत प्रवेश केला होता.

मेटपांजरा सर्कलमधून चिखले यांना डावलून डॉ. वैशाली टालाटुले यांना उमेदवारी जाहीर करणार असल्याची चर्चा होती. यामुळे चिखले यांनी अपक्ष लढण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी सलील यांनी मेटपांजरा व येनवा या दोन्ही सर्कलसाठी अर्ज भरला. यानंतर ते कोणत्या सर्कलमधून अर्ज मागे घेतील, या चर्चेला सुरुवात झाली. गुरुवार व शुक्रवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मॅरेथॉन बैठका घेत चिखले यांचे अर्ज मागे घेण्यासाठी मन वळविले. यासोबतच टालाटुले या देखील आपली उमेदवारी मागे घेणार आहेत.

अनिल देशमुखांचा मेळावा
शनिवारी अनिल देशमुख मेटपांजरा येथे कार्यकर्ता मेळावा घेणार असून यावेळी चिखले व टालाटुले अर्ज मागे घेणार असल्याचे जाहीर केले जाईल, अशी शक्‍यता आहे. असे झाल्यास सलील यांची थेट लढत भाजपचे उमेदवार सोनखांबचे सरपंच प्रवीण अडकिणे यांच्याशी होणार आहे. यामुळे येथे दोन तरुण उमेदवारांत लढतीची शक्‍यता आहे.

म्हणून निवडले मेटपांजरा
विधानसभा निवडणुकीत शेकापचे राहुल देशमुख यांनी अनिल देशमुख यांना मदत केली होती. जिल्हा परिषद निवडणुकीत दोन जागा द्याव्यात असे त्यावेळी ठरले होते, अशी चर्चा आहे. राहुल देशमुख यांचे विश्वासू समीर उमप यांनी येनवामधून उमेदवारी दाखल केली. सलील यांचा अर्ज येनवातून असल्याने राहुल नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सलील येनवातून अर्ज मागे घेणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com