अजित दादा,परत या : सक्षणा  सलगर ( व्हिडीओ ) - Sakshana Salgar urges Ajir Pawar to return to NCP | Politics Marathi News - Sarkarnama

अजित दादा,परत या : सक्षणा  सलगर ( व्हिडीओ )

संपत मोरे
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांना भावनिक साद घालताना दिसत आहेत. 

पुणे-"दादा,परत या. सुप्रियाताई नेत्याची नाही तर आपल्या भावाची वाट बघत आहेत.त्यांच्या डोळ्यात तुम्हाला प्रेम दिसेल. दादा तुम्ही फितूर पार्टीत राहू नका.या हा पक्ष तुमची वाट बघतोय, "अशी साद राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी आमदार अजित पवार यांना घातली आहे.

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांना भावनिक साद घालताना दिसत आहेत. सक्षणा सलगर यांनी त्यांना साद घातली आहे.

 

 

"दादा,तुम्ही भावनाप्रधान आहात. काल सुप्रियाताई यांच्या डोळ्यात पाणी आले.ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. सगळे कार्यकर्ते गहिवरले. तुम्ही हिकडे यावं अशी तुमची सगळ्यांची इच्छा आहे. आम्ही सगळे तुमची वाट बघतोय. हा पक्ष तुमचाच आहे. तुम्हीच आमचे नेते आहात,"असे सलगर यांनी म्हटले आहे.

"तुम्ही कस्तुरीच्या शोधात आहात पण कस्तुरी तुमच्याजवळच आहे.आम्ही तुमच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते तुमच्याकडे डोळे लावून बसलो आहोत,"असे सलगर यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून यांनी म्हटले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख