osamanabad-fight
osamanabad-fight

राणा जगजितसिहांना सक्षणा सलगर - कैलास पाटलांचे आव्हान ?

राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, महेंद्र धुरगुडे व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कैलास पाटील यांची नावे सध्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी चर्चेत आली आहेत.

उस्मानाबाद : सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विविध इच्छुकांची नावे समोर येत आहेत. त्यात जिल्हा परिषदेचे सदस्यही मागे नाहीत.

राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, महेंद्र धुरगुडे व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कैलास पाटील यांची नावे सध्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी चर्चेत आली आहेत. 

राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सक्षणा सलगर यांनी उस्मानाबाद मतदारसंघात लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सक्षणा यानी 2012 मध्ये तेर येथुन जिल्हा परिषद निवडणुक लढविली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता, पण त्यानंतर नाउमेद न होता त्यानी पक्षाचे काम करण्यास सूरुवात केली. 

त्याचवेळी राष्ट्रवादीच्या युवतीच्या मराठवाडा प्रवक्तेपदी त्यांची निवड झाली. वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी स्वतःची वेगळी छाप पाडली. 2017 साली त्यानी जिल्हा परिषद निवडणुक लढविली व त्यामध्ये त्यांनी विजयश्री खेचुन आणली. दरम्यानच्या काळात त्याना युवतीचे प्रदेशाध्यक्षपद देखील मिळाले. लोकसभा निवडणुकीमध्ये सक्षणा यांना स्टार प्रचारकाच्या यादीत स्थान मिळाल. आता त्या विधानसभेला इच्छुक आहेत.

 असाच दुसरा चेहरा म्हणजे महेंद्र धुरगुडे. तीनवेळा वेगवेगळ्या मतदारसंघातुन जिल्हा परिषद सदस्य होण्याचा त्यानी विक्रमच केला आहे. तुळजापुर मतदारसंघात राष्ट्रवादीचा हा चेहरा स्वतःची दखल घ्यायला भाग पाडतो.

पण मतदारसंघ आघाडीत काँग्रेसला असल्याने त्यांची भुमिका गुलदस्त्यात आहे, तरीही पक्ष माहित नाही पण लढायचय एवढ त्यानी निश्चित केले आहे. त्यानुसार गेल्या काही वर्षापासुन ते मतदारसंघात विधानसभेच्या दृष्टीने तयारी करत आहेत. त्यांच्यासाठी सध्या सर्वच पर्याय खुले आहेत.

 शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील हा तिसरा चेहरा.  कैलास पाटलाची राजकारणातील सूरुवात सारोळा बु गावाचे सरपंच म्हणुन झाली, तीन वेळा ग्रामपंचायत ताब्यात ठेवत त्यानी गावाचे नाव जलयुक्त शिवारमध्ये राज्यस्तरावर पोहचविले. शिवाय शेतीमध्ये नवीन प्रयोग, तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकरी गट व त्यामाध्यमातुन प्रोड्युसर कंपनी असा ग्रामीण भागाची नस ओळखलेला तरुण म्हणुन कैलास पाटील यांच्याकडे पाहिले जाते.

 राष्ट्रवादीकडुन जिल्हा परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने त्यानी ऐनवेळी सेनेतुन निवडणुक लढविली व मोठ्या मताधिक्याने जिंकलीसुध्दा. त्यांनी एस.टी.महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांचे चिंरजीव आदित्य गोरे यांचा पराभव केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात तेव्हापासुन ते चांगलेच चर्चेत आले. 

 शिवसेनेकडुन अगोदरचा इतिहास पाहुन त्यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविली. आता लोकसभेमध्ये त्यानी केलेले कामही संघटनात्मकदृष्ट्या ताकदीचे मानले जाते. यामुळे त्यांचेही नाव आता उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातुन पुढे येऊ लागले आहे. 

जिल्हा परिषदेच्या राजकारणातुन थेट विधानसभेमध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठी असते, त्यामुळे येणाऱ्या काळात यापैकी कोणाला संधी मिळणार का? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com