तिचं रडणं पाहून मी खूप अस्वस्थ झाले : सक्षणा सलगर - Sakshana Salgar gets upset | Politics Marathi News - Sarkarnama

तिचं रडणं पाहून मी खूप अस्वस्थ झाले : सक्षणा सलगर

सरकारनामा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

..

पुणे : "मी टीव्हीवर रडणारी मुलगी पाहिली, ती हंबरडा फोडून सांगत होती 'माझं दप्तर पुरात वाहून गेलं.'तिचं रडणं पाहून मी खूप अस्वस्थ झाले."असे राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी सांगितले.

सलगर उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. सलगर तेर येथील रहिवाशी असून त्या कोरडवाहू शेतकरी कुटुंबातील आहेत.  त्यांनी त्यांच्या सदस्य कालावधी संपेपर्यंतचे सगळे मानधन पूरग्रस्तांना दिले आहे.

पुरादरम्यान बातम्या पहाताना आठ-नऊ वर्षांच्या पूरग्रस्त मुलगी  आपली शाळेची पुस्तकं वाहून गेली हे हंबरडा फोडून सांगताना सलगर त्यांनी पाहिल्यावर त्या अस्वस्थ झाल्या. मग त्यांनी सामाजिक जाणिवेतून त्यांनी आपल संपूर्ण पूरग्रस्तांना देण्याचा निर्धार केला तसे पत्र उस्मानाबाद जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. संजय कोलते यांना त्यांनी दिले आहे.

"सध्या  महाराष्ट्रातील जनता पुराच्या पाण्यामुळे खूपच त्रस्त आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा खूपच तडाखा बसला आहे . घरात पाणी गेल्यामुळे लोकांचे जगणे असहाय्य झाले आहे. पुरग्रस्त नागरिक घरच्या बाहेर ,छावणीत राहून दिवस काढत असून खूपच हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. कठीण परिस्थितीशी सामना करत आहेत. त्यांची अवस्था पाहून मनाला वेदना होत आहेत. "

" माणुसकीच्या नात्याने मी जिल्हा परिषद सदस्या माझी नैतिक जबाबदारी म्हणून माझ्या कार्यकाळातील १ सप्टेंबर २०१९ पर्यंतचे माझा कार्यकाळ संपुष्ठात येईपर्यंतचे सर्व मानधन पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात यावे "असे  सलगर यांनी मुख्य कार्यकारी कोलते यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख