Sakshana Salgar is appointed as president of state NCP young women’s wing | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी सक्षणा सलगर यांची निवड

सरकारनामा
गुरुवार, 21 जून 2018

इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असलेल्या आणि विद्यमान उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सदस्या असलेल्या सक्षणा सलगर यांची आज युवती प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी उस्मानाबादच्या जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सिदराम सलगर यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवड केल्याची घोषणा केली आहे.
 

इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असलेल्या आणि विद्यमान उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सदस्या असलेल्या सक्षणा सलगर यांची आज युवती प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
 

तेर गावातील एका सामान्य कुटुंबातील असलेल्या सक्षणा सलगर यांच्या कामाची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची २०१६ मध्ये राज्याची स्टार प्रचारक म्हणून निवड केली होती. शिवाय त्या पक्षाच्या प्रवक्त्या म्हणूनही काम करत आहेत.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती संघटनेच्या स्थापनेपासून सक्षणा सलगर या संघटनेमध्ये काम करत आहेत. त्यांच्या कामाची पक्षाने दखल घेतली असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्ती जाहीर केली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख