सक्षणा तू उस्मानाबादचीच ना..

सक्षणा तू उस्मानाबादचीच ना..

उस्मानाबाद : " सक्षणा तू उस्मानाबादची ना' असे पवार साहेबांनी माझ्याकडे पाहत म्हणताच माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू निघाले. शरद पवार साहेब हे एक आगळंवेगळे रसायन आहेत, असे ऐकल होतं, पण त्याची प्रचिती प्रत्यक्षात या वाक्‍याने आल्याची भावना राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने दिल्लीत 2015 मध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील मान्यवरांना यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. अनेक राज्यातून मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते, केंद्रीयमंत्री यांच्यासह सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातले मातब्बर नेते कार्यक्रमाच्या ठिकाणी आले होते. 

राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसमध्ये काम करीत असल्याने खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मला आवर्जून निमंत्रिण दिले होते. त्यामुळे मी आणि माझी मैत्रिण आम्ही साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्लीला गेलो होतो. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वी दोन दिवस म्हणजे 10 डिसेंबरला आम्हाला भेटण्याची वेळ दिली होती. त्यानूसार सहा जनपथवर पोहोचलो. तेव्हा लालूप्रसाद यादव यांच्यासह बडे नेते पवार साहेबांच्या घरातून बाहेर पडत होते. क्षणभर विचार केला. एवढी मोठी माणस इथे येत आहेत. साहेब आम्हाला भेट देतील का? इतक्‍यात आम्हाला बोलावण्यात आले. मी आणि माझी मैत्रिण पवार साहेब बसलेल्या हॉलमध्ये गेलो. मला पाहताच पवार साहेब म्हणाले, "सक्षणा तु उस्मानाबादची ना, तुझे नाव सुप्रियाकडून ऐकलय, तुझे काम चांगले आहे' असे म्हणताच मला गहिवरून आले. 

तसे माझे काहीच काम नव्हते. मी साधी ग्रामपंचायत सदस्यही नव्हते. तेव्हा माझी दखल घेत मला नाव आणि जिल्ह्यासह त्यांनी ओळखले. यापूर्वी दोन वेळा मला पवार साहेबांच्यासमोर बोलण्याची संधी मिळाली होती. माझी त्यांची काही क्षणाची ओळख होती. अनेकजण सांगायचे की पवार साहेब एकदा ओळख झाली की पुन्हा विसरत नाहीत. याचा प्रत्यक्ष अनुभव मी तेव्हा घेतला. यातूनच मला सतत चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली. 

(शब्दांकनः सयाजी शेळके) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com