#WomensDay तनिष्का सदस्या बनली बिनविरोध उपसरपंच!

येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी तनिष्का सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्या कमलबाई उत्तम मोरे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली
Sakal Tanishqa Member Elected Sarpanch of Nijampur
Sakal Tanishqa Member Elected Sarpanch of Nijampur

निजामपूर (धुळे) : येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी तनिष्का सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्या कमलबाई उत्तम मोरे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सभागृहात बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सलीम पठाण होते. ग्रामविकास अधिकारी पी.बी.मोराणे निवडणूक निर्णय अधिकारी होते.

 माजी उपसरपंच अनिता मोहने यांनी नुकताच उपसरपंचपदाचा राजीनामा दिला. त्या पार्श्वभूमीवर कमलबाई मोरे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत सदस्य दीपक देवरे सूचक होते. दरम्यान ग्रामपंचायत सदस्य प्रवीण वाणी व परेश वाणी यांनीही उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केले होते. परंतु दिलेल्या मुदतीत दोघांनीही माघार घेतल्याने कमलबाई मोरेंची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त उपसरपंचांचा सत्कार केला.

सतरापैकी नऊ सदस्य हजर होते. त्यात उपसरपंच मोरे, सरपंच सलीम पठाण, माजी सरपंच अजितचंद्र शहा, माजी उपसरपंच दिलनूरबी सय्यद, रजनी वाणी, ग्रामपंचायत सदस्या सुनंदा बेंद्रे, रवींद्र वाणी, परेश वाणी, दीपक देवरे यांच्यासह पंचायत समिती सदस्य सतीश वाणी, माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

पंचायत समितीचे माजी सदस्य वासुदेव बदामे यांनी कमलबाई मोरेंना नेतृत्व मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तर सरपंच पठाण यांनी राजकारणात महिलांनाही नेतृत्वाची संधी देणे गरजेचे असल्याचे सांगितले. उपसरपंच मोरे यांनी यापूर्वी तनिष्का गटात सदस्या म्हणूनही काम केले आहे. निवडप्रकिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com