saibaba naxal relation | Sarkarnama

साईबाबा-नक्षलवादी संबंध जोडण्याचा आटापिटा ? 

सरकारनामा न्यूजब्युरो 
गुरुवार, 23 मार्च 2017

डाव्या विचारसरणीचे प्रा. जी.एन. साईबाबा यांचा थेट नक्षलवाद्यांशी संबंध जोडण्याचा आटापिटा सध्या नक्षल प्रतिबंधक सेलचे (एएनसी) अधिकारी करीत आहेत. काही गावात साईबाबाच्या समर्थनार्थ फलक लागल्यामुळे साईबाबा नक्षलवादी आहे, असाच प्रचार सरकारी पातळीवरच सुरू झाला आहे. 

नागपूर : डाव्या विचारसरणीचे प्रा. जी.एन. साईबाबा यांचा थेट नक्षलवाद्यांशी संबंध जोडण्याचा आटापिटा सध्या नक्षल प्रतिबंधक सेलचे (एएनसी) अधिकारी करीत आहेत. काही गावात साईबाबाच्या समर्थनार्थ फलक लागल्यामुळे साईबाबा नक्षलवादी आहे, असाच प्रचार सरकारी पातळीवरच सुरू झाला आहे. 

नक्षलवाद्यांना मदत करणे, समाजविघातक कृत्यामध्ये सहभागी झाल्याच्या आरोपावरून गडचिरोली सत्र न्यायालयाने यापूर्वी प्रा. साईबाबांना जन्मठेपेची शिक्षा
ठोठावली आहे. त्यांच्यासह पाच जण सध्या नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यांच्या समर्थनार्थ भामरागड तालुक्‍यातील काही गावांमध्ये फलक लागले. हे फलक नक्षलवाद्यांनी नव्हे तर गावातील काही तरुणांनी लावले आहेत. एरिया रक्षक दल व ग्राम रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रा. साईबाबांसह इतरांची जन्मठेपेची शिक्षा रद्द करावी, असा लिहिलेला मजकुराचे फलक काही गावांमध्ये लागले आहे. या फलकांचे छायाचित्रे काढून पोलिसांनी प्रा. साईबाबांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे स्पष्ट होत असल्याचे प्रसिद्धी पत्रक नक्षल प्रतिबंधक सेलने (एएनसी) वर्तमानपत्रांना पाठविले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख