Sai Sansthan will provide Rs 51 crore in support of Corona | Sarkarnama

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थान देणार 51 कोटी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 मार्च 2020

महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात असली, तरी त्यावर उपाययोजना करताना राज्याला मोठा खर्च येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने निर्णय घेवून 51 कोटी रुपये देण्याचे नियोजन केले आहे

नगर : जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेले शिर्डी येथील साई संस्थानच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निधीसाठी 51 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. 

याबाबत न्यायालयाने नियुक्त केलेली समितीचा निर्णय झाला आहे. दरम्यान, संस्थानच्या वतीने आज सहा हजार नाश्ता पाकिटे नगर पोलिस मुख्यालयाकडे पाठविण्यात आली आहेत.

देशाच्या आपत्कालिन परिस्थितीत कायम देवस्थाने धावून जात आहेत. यापूर्वी साई संस्थानच्या वतीने प्रत्येक आपत्कालिन परिस्थितीत राज्याला, देशाला मोठी मदत केली आहे. कोरोनाचे मोठे संकट जगावर आले आहे.

महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात असली, तरी त्यावर उपाययोजना करताना राज्याला मोठा खर्च येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने निर्णय घेवून 51 कोटी रुपये देण्याचे नियोजन केले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख