चंद्रकांतदादा अज्ञानी ; पवारांचा टोला !

"महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना शेतीचे ज्ञान नाही आणि त्यांना समजावून सांगण्यासाठी मला वेळ मिळाला नाही', असा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला आहे.
 चंद्रकांतदादा अज्ञानी ; पवारांचा टोला ! 
चंद्रकांतदादा अज्ञानी ; पवारांचा टोला ! 

दिल्ली : "महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना शेतीचे ज्ञान नाही आणि त्यांना समजावून सांगण्यासाठी मला वेळ मिळाला नाही', असा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला आहे. 

दोन दिवसांपुर्वी कोल्हापूर येथे बोलताना चंद्रकांतदादा पाटील यांनी पवारांवर टीका केली होती. फडणवीस सरकार शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेत आहे. पंधरा वर्षे सत्तेत असताना कॉंग्रेस- राष्ट्रवादीने काही केले नाही. शेतकरी हिताचे निर्णय घेताना पवारांचे हात बांधले होते काय, असा सवाल करत "शेतकऱ्यांचा राजा' ही उपाधी जात असल्याची भीती पवारांना वाटते, अशी टीका चंद्रकांतदादांनी केली होती. चंद्रकांतदादांनी थेट पवारांना लक्ष्य केल्याने राजकीय वर्तुळात तिखट प्रतिक्रिया व्यक्‍त झाल्या. विधान परिषदेचे पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चंद्रकांतदादांचा ट्टिटरवरुन समाचार घेतला होता. 

मंगळवारी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून कर्जमुक्‍तीची मागणी केली. त्यानंतर पत्रकारांनी चंद्रकांतदादांच्या टिकेबद्दल विचारले असताना ते म्हणाले की, मी कृषीमंत्री असताना पीक कर्जाचा व्याजदर 12 वरुन 4 वर आणला. हे चंद्रकांत पाटीलांना माहिती नसेल कारण ते शिक्षकांचे प्रतिनिधी होते. शाळेतील धड्यांपलीकडे चंद्रकांत त्यांना माहिती नाही. शेतीबद्दल त्यांना ज्ञान नाही आणि त्यांना समजावून सांगण्यासाठी मला वेळ मिळाला नाही, असे पवार म्हणाले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com