सागर खोत भाजयुमोचे सांगली जिल्हाध्यक्ष; सदाभाऊंचेही कमळावर लढण्यावर शिक्कामोर्तब - sagar khot appointed as bjym sangali president | Politics Marathi News - Sarkarnama

सागर खोत भाजयुमोचे सांगली जिल्हाध्यक्ष; सदाभाऊंचेही कमळावर लढण्यावर शिक्कामोर्तब

संपत मोरे
मंगळवार, 16 जुलै 2019

पुणे : सांगली जिल्हा भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांची आज निवड करण्यात आली. या पदावर पूर्वी गोपीचंद पडळकर होते. त्यांनी भाजप सोडल्यानंतर हे पद रिकामे होते. त्या जागेवर युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी खोत यांची नियुक्ती केली.

खोत यांच्या नावाची कसलीही चर्चा नसताना त्यांची निवड झाली आहे. या निवडीमुळे  सदाभाऊ खोत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून मधुन जयंत पाटील यांच्या विरोधात लढणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.

स्वभिमानी शेतकरी संघटनेची साथ सोडल्यावर राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांचे मार्ग वेगवेगळे झाले. सदाभाऊ भाजपचे स्टार प्रचारक तर शेट्टी भाजपचे कडवे विरोधक बनले. लोकसभा निवडणुकीत एकेकाळचे दोन मित्र परस्परावर कडवी टिका करत होते.

लोकसभा निवडणुकीनंतर खोत यांच्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली. खोत यांनी त्यांच्या रयत क्रांती संघटनेसाठी काही जागा मागितल्या आहेत. त्यात इस्लामपूरचा समावेश आहे. खोत कोणत्या चिन्हावर लढतील असे प्रश्न उपस्थित होत असताना सागर खोत यांना भाजपने जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष केल्याने सदाभाऊ भाजपच्या कमळ चिन्हावर लढतील, असे स्पष्ट झाले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख