औरंगाबादच्या साधना सुरडकर यांची महिला आर्थिक विकास महामंडळावर नियुक्ती

 औरंगाबादच्या साधना सुरडकर यांची महिला आर्थिक विकास महामंडळावर नियुक्ती

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातून सध्या मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु आहे. यामूळे भाजपातील निष्ठावंतामध्ये चलबिचल सुरु झाले आहे. असे असले तरी भाजपतर्फे निष्ठावंताचा सन्मान राखण्यात येत आहे. पक्षाची सत्ता नसतानाही पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या औरंगाबादच्या माजी उपमहापौर साधना सुरडकर यांची महिला आर्थिक विकास महामंडळावर निवड करण्यात आली आहे. ही निवड म्हणजे पक्ष निष्ठेचे फळ असल्याचे साधना सुरडकर यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्यावतीने विविध महामंडळाच्या नियुक्‍त्या करून अनेकांना खुश करण्यात येत आहेत. याच माध्यमातून महिला व बालकल्याण विभागाने राज्यातील 11 महिला सदस्यांची नावे सोमवारी रात्री जाहीर केली आहेत. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पद भूषवलेल्या चित्रा वाघ यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. यात दर्शना महाडिक, विनर तेलंग, शलाका साळवी, रितू तावडे, चंद्रकांता सोनकांबळे, मीनाक्षी पाटील, उमाराम शेट्टी, शैलाजा गर्दी आणि अर्चना डेहनकर व साधना सुरडकर यांचाही समावेश आहे. 

निवडीनंतर साधना सुरडकर म्हणाल्या, एक निष्ठेने भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करीत आहे. 1995 मध्ये भाजपकडून समर्थनगरातून महापालिका निवडणुक लढवली होती. तेव्हा 9 मतांनी पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर 2000 मध्ये विश्‍वभारती कॉलनी येथून भाजपच्या नगरसेविका म्हणून निवडून आले. त्यानंतर 2004-05 मध्ये त्या उपमहापौर झाले. त्यावेळीही पक्षाचे काम सुरुच होते. त्यानंतर पुन्हा 2010 ते 2015 दरम्यान पुन्हा जयविश्‍वभारती कॉलनीतून नगरसेविका म्हणून निवडुन आले, त्यानंतर मात्र महापालिका निवडणुक लढवली नाही. आता सध्या पक्षाने भाजप शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. या निवडीनंतर मी महिलांचे विविध प्रश्‍नावर काम करेल. पक्षानी टाकलेली जबाबादारीचे भान ठेवत आजून चांगले काम करणार आहे. या पदाच्या माध्यमातून महिलांना न्याय देणार असल्याचेही साधाना सुरडकर यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com