Sadhana Mahajan Campaigning For Her Husband Girish Mahajan | Sarkarnama

गिरीश महाजनांच्या प्रचाराची धुरा सांभाळताहेत सौ. साधना महाजन

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

जिल्ह्याचे पालकमंत्री,राज्याचे जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर पक्षाने राज्यातील उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या जामनेर मतदार मतदार संघात त्यांच्या प्रचाराची जबाबदारी मात्र त्यांच्या पत्नी सौ. साधना महाजन सांभाळत आहेत.

जळगाव  : जिल्ह्याचे पालकमंत्री,राज्याचे जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर पक्षाने राज्यातील उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या जामनेर मतदार मतदार संघात त्यांच्या प्रचाराची जबाबदारी मात्र त्यांच्या पत्नी सौ. साधना महाजन सांभाळत आहेत.

भारतीय जनता पक्षाचे 'चाणक्‍य'म्हणून ओळखले जाणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे विधासभा निवडणूकीत पक्षाला मोठे यश मिळवून देण्यासाठी राज्यभर उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. त्यांच्या जामनेर मतदार संघात प्रचाराचा किल्ला त्यांच्या पत्नी सौ.साधना महाजन या लढवित आहेत. साधना महाजन या जामनेर नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्षा आहेत. जिल्हा परिषदेच्या त्या माजी सदस्या आहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या खाद्यांला खांदा लावून त्या गेल्या पंचवीस वर्षापासून विधानसभा निवडणूकीत प्रचार करीत आहेत. परंतु यावेळची परिस्थिती थोडी वेगळी आहे, यावेळी गिरीश महाजन यांच्या पक्षाने राज्यातील उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी दिली आहे. त्या प्रचारासाठी महाजन आता जोमाने कामाला लागले आहेत.

महाजनांच्या अनुपस्थितीत जामनेर विधानसभा मतदार संघात मात्र सौ. साधना महाजन यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. गेल्या पंचविस वर्षापासून त्यांना प्रचाराचा अनुभव आहेच. मात्र, त्या प्रथमच स्वतंत्रपणे प्रचार करीत आहेत. प्रचाराचा त्यांचा दिनक्रम ठरलेला आहे. मतदार संघात प्रचार करतांना दररोज सात आठ गावात त्या कार्यकर्त्यासह प्रचार करीत असतात. सकाळी 9 वाजता दररोज त्या प्रचारास बाहेर पडतात. जवळची गावे असल्यास प्रचाराचा पहिला टप्पा आटोपून घरी येवून कार्यकर्त्यासह भोजन करतात, व दुपारी पुन्हा दुसऱ्या टप्प्यात गावोगावी जावून प्रचार करतांत.

मात्र, दूरची गावे असल्यास त्या स्वत:सह कार्यकर्त्यांचा डबा घेवून निघतात. सकाळी 9 वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत सात ते आठ गावांत त्या प्रचार करीत असतात. मतदार संघातील प्रत्येक गावात घरोघरी जावून मतदारांच्या भेटी त्या घेत असतात. महाजन यावेळी विक्रमी मतदाधिक्‍यांने विजयी होतील, असा त्यांना विश्‍वास आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख