पंढरपूरच्या नगराध्यक्षा विधानसभा लढणार!

अलीकडेच मुख्यमंत्र्यांचे ओएसडीश्रीकांत भारती यांनी तालुक्यातील राजकीय परस्थितीचा अंदाज घेतला आहे.
पंढरपूरच्या नगराध्यक्षा विधानसभा लढणार!

पंढरपूर : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत तरीही पंढरपूरच्या भाजप उमेदवाराचा अजूनही सस्पेन्स कायम आहे. या उलट सत्ताधारी भाजपापेक्षा विरोधी पक्षाच्या उमेदवारांचीच चर्चा अधिक सुरु आहे. 

काँग्रेसचे विद्यमान आमदार भारत भालके यांची भूमिका अजूनही तळ्यात मळ्यात आहे. तर या उलट सत्ताधारी भाजपकडे सर्वकाही सत्तास्थाने असतानाही अजूनही उमेदवाराच्या बाबतीतला सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे ऐनवेळी एखाद्या नवख्या उमेदवाराचे नाव पुढे येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

पंढरपूर -मंगळेवढा विधानसभा मतदार संघात भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अलीकडेच मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक सचिव श्रीकांत भारती यांनी तालुक्यातील राजकीय परस्थितीचा अंदाज घेतला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या काही दुसऱ्या फळीतील नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या आहेत. या सर्व घटनांमुळे स्वतः मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात लक्ष घातल्याची चर्चा सुरु आहे.

काँग्रेसचे विद्यमान आमदार भारत भालके यांनी मागील काही दिवसांपूर्वीच मतदार संघाचा एका दौरा पूर्ण करुन कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्या आहेत. त्यानुसार ते भाजप किंवा सेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर पारंपारिक विरोधक असलेले आमदार प्रशांत परिचारक व त्यांचे समर्थक कार्यकर्ते मात्र अजूनही शांतच आहेत. 

आमदार प्रशांत परिचारक यांची विधान परिषदेची आणखी तीन वर्षे आहेत. त्यामुळे प्रशांत परिचारक स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरतिल का या विषयी साशंकता आहे. त्यामुळे परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांमधून माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या नावाला आग्रह आहे. परंतु सुधाकर परिचारकांचे 80 वर्षांचे वयोमान पहाता भाजप त्यांना उमेदवार देणार का, हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.  

मंगळवारी (ता.27) भाजपचे निरीक्षक राम शिंदे यांनी सोलापुरात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, पंढरपुरातून फक्त विठ्ठल इंजिनिरींग कॉलेजचे प्राचार्य बी.पी. रोंगे यांनी एकमेव मुलाखत दिली आहे. त्यामुळे परिचारक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की एकाद्या कार्यकर्त्यांला विधानसभेला संधी देणार याची ही उत्सुकता शिगेला पोचली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार भालकेंनी भाजपात प्रवेश करुन उमेदवारी घेतली तरी निवडणुक काळात  भालके- परिचारकांच्या कार्यकर्त्यांचे कितपत मनोमीलन होईल, याविषयी शंका आहे. त्यामुळे परिचारक आपल्याच परिवारातील कार्यकर्त्याला संधी देतील अशी शक्याता ही या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.

परिचारक गटाने तसा पर्याय निवडला तर पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या नावावर एकमत होऊ शकते. शिवाय आमदार भालकेंना त्या चांगली टक्कर देखील देऊ शकतात. त्यामुळे साधना भोसले यांच्या नावाची सध्या मतदार संघात चर्चा सुरु झाली आहे. ऐनवेळी आमदार प्रशांत परिचारक कोणता निर्णय घेतात यावरच पंढरपुरच्या भाजपच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून राहणार हे मात्र तितकेच स्पष्ट आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com