सदाभाऊंची रयत क्रांती पन्हाळ्यावरून रणशिंग फुंकणार 

सदाभाऊंची रयत क्रांती पन्हाळ्यावरून रणशिंग फुंकणार 

सातारा : आगामी राजकिय वाटचाल, निवडणुका आणि सध्याची परिस्थिती यावरून रयत क्रांती संघटनेची आगामी रणनिती ठरविण्यासाठी येत्या 24 व 25 मार्चला पन्हाळ्यावर (कोल्हापूर) पदाधिकाऱ्यांचे शिबिर होत आहे. या शिबिरात कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील, युवा आघाडीचे शार्दूल जाधव हे मार्गदर्शन करणार आहेत. येथूनच रयत क्रांतीचे आगामी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले जाणार आहे. 

मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने महाराष्ट्रात जिल्हानिहाय ऑनलाइन सभासद नोंदणी केली आहे. या नोंदणीनंतर आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर संघटनेची भुमिका आणि आगामी रणनिती ठरविण्यात येणार आहे. त्यासाठी पन्हाळ्यावर त्यांचे प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिबिर येत्या 24 व 25 मार्चला होणार आहे.

या शिबिरात संघटनेची बांधणी, पदाधिकारी निवडी, तसेच शेतकऱ्यांचे प्रश्‍न, विधानसभा-लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच्या मागण्यांबाबत चर्चा, तसेच कोणासोबत युती करायची आणि कोणत्या मतदारसंघात संघटनेची ताकद आहे, कोठून निवडणुका लढायच्या याचा उहापोह होणार आहे. यामध्ये संघटनेची राजकिय भूमिका या शिबिरात स्पष्ट होणार आहे. त्यासाठी स्वत: मंत्री सदाभाऊ खोत या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरासाठी येताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील राजकिय आराखडे घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे प्रदेश संघटक संजय भगत यांनी केले 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com