अजितदादांनी मला अनेकदा सांभाळून घेतले: सदाभाऊ खोत

"पवार कुटुंबाशी वैचारिक मतभेद आहेत मात्र जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे.
अजितदादांनी मला अनेकदा सांभाळून घेतले: सदाभाऊ खोत

पुणे : "अजित पवार हे महाराष्ट्राच्या विधिमंडळात सर्वांत जास्त काळ उपस्थित राहणारे सदस्य आहेत. त्यांच्या कामाची पद्धत सर्वांना बरोबर घेऊन जायची आहे. मी मंत्री म्हणून उत्तरे देताना चुकायचो तेव्हा त्यांनी मला अनेकदा सांभाळून घेतले.  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्तुती केली. त्यात राजकारण नाही तर चांगल्याला चांगलं म्हणण्याची संस्कृती आहे," असे मत माजी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांचे कौतुक केले. त्यावरून राजकीय समीकरणे बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत सदाभाऊ खोत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये राजकारण शोधण्याचा प्रयत्न करू नये असे सांगत खोत यांनी आपल्या विधिमंडळातील कामकाजाच्या काही आठवणी सांगितल्या.

खोत म्हणाले,"अजितदादा पवार हे सभागृहात सकाळी दहा वाजता यायचे आणि रात्री उशिरा एक वाजेपर्यंत थांबायचे. सत्ताधारी सदस्यांनी बोलायला हात वर केला आणि अध्यक्ष त्याला परवानगी नाकारत असतील तर स्वतः अजितदादा अध्यक्षांना विनंती करायचे की त्या सभासदाला बोलू द्या. मी याबाबत अजित दादांना म्हणालो की अजितदादा तुम्ही आमच्या गटातील सदस्यांनी बोलावे यासाठीसुद्धा अध्यक्षांना विनंती का करता? त्यावर अजितदादा म्हणाले की,"तो सदस्य एवढा वेळ इथं बसून राहिलेला आहे. त्याने जर बोलण्याची परवानगी मागितली तर त्याला दिली पाहिजे. कारण इथं त्याने मांडलेला प्रश्न आणि त्याला मिळालेले उत्तर त्याला मतदारसंघात सांगता आले पाहिजे. जनतेला तो सांगेल तुमचा हा प्रश्न मी विधानसभेमध्ये ताकदीने मांडला आहे. अजितदादा यांच्याकडे मला हा उमदेपणा बघायला मिळाला आणि तो सांगितला पाहिजे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com