भारत भालके यांचे सर्व पक्ष फिरून झाले : सदाभाऊ खोत 

sadabhau_khot_
sadabhau_khot_

भोसे :  आ. भारत भालके यांनी विठ्ठलाच्या नावाने असलेला कारखाना खाल्ला तो जनतेची पर्वा काय करणार असा सवाल करत आतापर्यंत त्यांनी एकही पक्ष सोडला नसून आता तर त्यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस या पवित्र पक्षात प्रवेश केला.

हा पक्ष नसून अलीबाबा चाळीस चोराचा  पक्ष असल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तालुक्यातील भोसे येथे बोलताना व्यक्त केला.

शिवसेना, भाजप, रिपाई, महासंग्राम युतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी  मा. खा.रणजितसिंह मोहिते पाटील ,खा. डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजी आ. प्रशांत परिचारक पं. स. सदस्य सुरेश ढोणे नितीन पाटील दादासो गरंडे कांतीलाल ताटे भारत पाटील जयंतराव साळे गौडापा  बिराजदार सूर्यकांत ठेंगील काशिनाथ पाटील नितीन पाटील दीपक वाडदेकर नामदेव जानकर बापूराव मेटकरी सुरेश कांबळे विजय बुरकुल बंडु जाधव धनंजय गडदे दत्तात्रय ताटे आदी मान्यवर उपस्थित होते . 

यावेळी बोलताना कृषी राज्यमंत्री खोत म्हणाले, मोठ्या मालकाला पांडुरंगाच्या रूपाने उभा केले असून 2009 साली आ.भालकेनी आपल्याकडे उमेदवारी मिळावी म्हणून घराला चकरा मारल्या उमेदवारी देत प्रचार करून आमदार केल्यावर नऊ दिवसात आम्हाला सोडले सोडून गेले.

जे औदुंबर आण्णा विसरतात मग आम्हाला कसं विसरणार नाहीत असा सवाल करत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलने केलेला सदाभाऊ हा देखील मंगळवेढ्याच्या पाण्यासाठीची लढाई लढण्यास तयार आहे. 

परंतु मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे कृष्णा खोय्रात अतिरिक्त होणारे पाणी मंगळवेढ्यास देणार आहे.ते सहा महिन्यात 45 गावाचा प्रश्न सोडवल्या शिवाय राहणार नाही आणि आता आ.भालके म्हणतात मी या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे .

तर दहा वर्षे कुठे गेला होता असा सवाल करत 45 गावाचा प्रश्न सोडल्याशिवाय मी परत या तालुक्यात सभा घ्यायला येणार नाही अशी प्रतिज्ञा खा. महास्वामीजी साक्षी ठेवत केली. यावेळी आ.भालके, अवताडे समर्थकांनी परिचारक गटात प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com