Sadabhau Khot to Form New Party | Sarkarnama

सदाभाऊ खोत नवा पक्ष स्थापणार?

संपत मोरे
गुरुवार, 16 जानेवारी 2020

माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत लवकरच नवा पक्ष स्थापन करणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आपल्याच चिन्हावर लढवता याव्यात अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. रयत क्रांती संघटनेचे पक्षात रूपांतर होण्याची शक्यता आहे.

पुणे : माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत लवकरच नवा पक्ष स्थापन करणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आपल्याच चिन्हावर लढवता याव्यात अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. रयत क्रांती संघटनेचे पक्षात रूपांतर होण्याची शक्यता आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी खोत यांचे मतभेद झाल्यानंतर त्यांनी रयत क्रांती संघटना स्थापन केली. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीकडे हातकणंगले मतदारसंघ मागितला होता मात्र तो शिवसेनेकडे गेला. विधानसभा निवडणुकीत फलटण आणि अक्कलकोट हे दोन मतदारसंघ रयत क्रांतीला मिळाले मात्र तिथे त्यांना भाजपच्या चिन्हावर लढावे लागले.अक्कलकोट मध्ये विजय मिळाला तर फलटण मध्ये पराभव पत्करावा लागला.

आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढवायच्या काय?असा प्रश्न कार्यकर्त्यांपुढे असतानाच रयत क्रांती पक्षाची स्थापना होणार आहे. रयत क्रांतीच्या औरंगाबाद येथील कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय होणार आहे. तशा हालचाली सुरू आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख