कर्जमाफी म्हणजे कोपराला लावलेला गूळ: खोत

कर्जमाफी देतो असे आश्वासन इथूनपुढे कोणत्याही पक्षाने देऊ नये. कर्जमाफीने शेतकरी सुधारणार नाही .त्यापेक्षा त्याने घाम गाळून पिकवलेल्या शेतीमालाला रास्त भाव द्यावा. कर्जमाफी म्हणजे कोपराला लावलेला गुळ आहे
sadabhau khot news
sadabhau khot news

पुणे : "कर्जमाफी हा शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा शाश्वत उपाय नाही. कर्जमाफी म्हणजे कोपराला लावलेला गूळ आहे. शेतीमालाला रास्त भाव दिल्याशिवाय शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही," असे मत आमदार सदाभाऊ खोत यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केले.

महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या कर्जमाफीवर खोत यांनी आपली सडेतोड मते मांडली. "निवडणुकीच्या अगोदर जाहीरनाम्यात सरसकट कर्जमाफी देणार, सातबारा कोरा करणार असे म्हणायचे आणि प्रत्यक्ष मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची नाही, हे धोरण चुकीचे आहे. असे जर सुरू राहीले तर शेतकरी कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यावर बिलकुल विश्वास ठेवणार नाहीत. जाहीरनाम्यात कर्जमाफी देताना ती नेमकी कशी देणार हे त्यात नमूद करायला हवे. शेतकऱ्यांची अशी थट्टा कोणत्याही सरकारने करायला नको, "असे खोत म्हणाले.

"कर्जमाफीने कोणताही शेतकरी सक्षम होणार नाही.क र्जमाफी करायची असेल तर शेतकऱ्याच्या अंगावर असलेल्या कर्जाचे व्याज बंद करावे. त्याला नवीन कर्ज द्यावे. या कर्जातून त्याने पिकवलेल्या शेतीमालाला योग्य भाव द्यावा आणि त्यातून मिळणाऱ्या रकमेतून टप्प्याटप्प्याने जुने कर्ज वसूल करावे,"असा सल्ला त्यांनी दिला.

"कापूस विदर्भात पिकतो आणि सूतगिरण्या पश्चिम महाराष्ट्रात असतात. ऊस सांगली कोल्हापूरला पुण्याला पिकतो तर साखर कारखाने मराठवाड्यात, विदर्भात असतात. यामुळे शेतकऱ्यांने पिकवलेल्या मालाला योग्य दर मिळतो का ?" असा प्रश्न उपस्थित करून खोत म्हणाले," मध्यंतरी मेंढ्या विमानातून परदेशात पाठवायच्या होत्या, पण काही संघटनांनी त्याला विरोध केला. मेंढ्याची जर निर्यात झाली असती तर मेंढीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ झाला असता पण काही लोक विनाकारण आडवे आले. त्यांनी विरोध केला. त्यामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान झाले"असे खोत म्हणाले.

"कर्जमाफी देतो असे आश्वासन इथूनपुढे कोणत्याही पक्षाने देऊ नये. कर्जमाफीने शेतकरी सुधारणार नाही .त्यापेक्षा त्याने घाम गाळून पिकवलेल्या शेतीमालाला रास्त भाव द्यावा. कर्जमाफी म्हणजे कोपराला लावलेला गुळ आहे."असे खोत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com