`भाजपमध्ये काम करण्याची संधी'

`राष्ट्रवादी'तील जी चांगली मंडळी भाजपात येत आहेत त्याना मी धन्यवाद देतो असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.
`भाजपमध्ये काम करण्याची संधी'

सांगली - सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे वातावरण सुरू होऊ लागले आहे. भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू आहे. जे चांगले लोक आहेत आणि ग्रामीण भागाशी नाळ जोडलेल्या अशा चांगल्या लोकांना निश्चितपणानं भाजपात काम करण्याची संधी देण्याची भूमिका या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे असे सांगत `राष्ट्रवादी'तील जी चांगली मंडळी भाजपात येत आहेत त्याना मी धन्यवाद देतो असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. 

विरोधकांच्या दुकानांना सध्या कुलप लागलीत, हाताला काही काम नसल्याने ईव्हीएम वरून सतत आरोप केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

खोत म्हणाले, की काँग्रेस सरकारच्या सत्ता काळापासूनच ईव्हीएम मशीन वापरल्या जात होत्या. जर ईव्हीएम यंत्रणा अयोग्य होती तर काँग्रेस सरकारच्या काळात का वापरली गेली याचं पहिलं उत्तर जनतेला द्याव. नाचता येईना अंगण वाकडे अशी विरोधकांची अवस्था झाली आहे, त्यामुळे ईव्हीएम वरून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. 

विरोधकांकडे आता राज्यातील प्रश्नच शिल्लक  नसल्याने हा ईव्हीएमचा मुद्दा सतत उचलला जातोय. विरोधकांच्या हातांना सध्या आता काही काम नाही. त्यामुळे हे सर्व आरोप होत आहेत.  महाराष्ट्रातील विरोधकांच्या दुकानांना सध्या कुलप लागली आहेत, त्यामुळे  त्यांच्या दुकानदार्‍या आता बंद झाल्या आहेत अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी ईव्हीएम वरून भाजप सरकारवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलेय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com