सदाभाऊंची `भविष्यवाणी'; विरोधी पक्षातील निम्मे आमदार `पागल' होणार

राज्यातील बाजार समित्या शेतकऱ्यांचे कत्तलखाने बनल्या आहेत. कोरेगावच्या आमदारांनी कृषीमाल नियमन विधेयकाला विरोध केला होता. कारण शेतकऱ्याला कापण्यासाठी तो बाजार समितीमध्येच आला पाहिजे. या पार्श्‍वभूमीवर मुंबई बाजार समितीची सध्या सुरु असलेली चौकशी अंतिम टप्प्यात आहे. कोण-कोण तुरुंगात जातेय, हे लवकरच कळेल, अशा शब्दांत कृषी, फलोत्पादन व पणन राज्यमंत्री व सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा थेट नामोल्लेख टाळून विरोधकांना गर्भित इशारा दिला.
सदाभाऊंची `भविष्यवाणी'; विरोधी पक्षातील निम्मे आमदार `पागल' होणार

कोरेगाव (जि. सातारा) : राज्यातील बाजार समित्या शेतकऱ्यांचे कत्तलखाने बनल्या आहेत. कोरेगावच्या आमदारांनी कृषीमाल नियमन विधेयकाला विरोध केला होता. कारण शेतकऱ्याला कापण्यासाठी तो बाजार समितीमध्येच आला पाहिजे. या पार्श्‍वभूमीवर मुंबई बाजार समितीची सध्या सुरु असलेली चौकशी अंतिम टप्प्यात आहे. कोण-कोण तुरुंगात जातेय, हे लवकरच कळेल, अशा शब्दांत कृषी, फलोत्पादन व पणन राज्यमंत्री व सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा थेट नामोल्लेख टाळून विरोधकांना गर्भित इशारा दिला. 

दरम्यान, पुढच्या वेळेस आमचेच सरकार येईल आणि विरोधी पक्षातील निम्मे आमदार `पागल' झालेले दिसतील, असा टोलाही श्री. खोत यांनी लगावला. 

खेड (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथे साकव पूल, संरक्षक भिंतीसह विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपचे महेश शिंदे, संदीप शिंदे, उत्तमराव शिंदे, उत्तमराव कदम, आनंदराव कदम, सरपंच संजय कदम, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, राहुल बर्गे, संजय भगत उपस्थित होते. 

कोणी कितीही देव पाण्यात घालू द्या, आम्हीच बहुमताने सत्तेत येणार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार, असा विश्‍वास व्यक्त करुन सदाभाऊ खोत म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आमच्या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला, जिहे-कटापूर, ताकारी-म्हैसाळसह रखडलेल्या शेतीच्या पाणी योजना मार्गी लावल्या. या सर्व योजनांचे 85 टक्के वीज बिल शासन भरणार आहे. शेतकऱ्यांना 15 टक्केच बिल भरावे लागेल. मुख्यमंत्री आरोग्य साह्य योजनेसह अनेक योजना केंद्र व राज्य शासनामार्फत राबवत आहोत. शेतकऱ्यांना उसाचे पैसे जादा मिळावेत, यासाठी कारखानदारांनी 29 रुपयांपेक्षा कमी दराने साखरेची विक्री करायची नाही, असे ठरवले. आता हा दर 32 रुपयांवर नेणार आहे. असे असताना काहींना सत्तेची घाई झाली आहे. त्यांनी गेल्या 60 वर्षांत केलेली घाण उपसायला आम्हाला किमान दहा वर्षे तरी द्या.

आम्ही कारखाने काढले नाहीत, वाळूमाफिया नाही, अन्य टेंडरही घेतली नाहीत, त्यामुळे आम्हाला कशाचीही फिकिर नाही. पुढच्या वेळेस आमचे सरकार आल्यास विरोधी पक्षातील निम्मे आमदार पागल झालेले दिसतील. कारण त्यांचा धंदा बंद पडेल. खेड गावासाठी एक कोटीची पाणीयोजना, संरक्षक भिंत, साकवपूल मंजूर केल्याचे सांगून भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव देण्याची सूचना त्यांनी केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com