सदाभाऊ खोत पाहणीसाठी आले अन्‌ पेरणी करुन गेले...

सदाभाऊ खोत पाहणीसाठी आले अन्‌ पेरणी करुन गेले...

नांदेड : जन्मतःच काळ्या आईशी घट्ट नाळ असलेले कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी गाड्यांचा ताफा थांबवून सोबतच्या लोकांच्या लक्षात येण्याच्या आत थेट शेतातील औत गाठत शेतकऱ्यांकडचे धान्य घेऊन चाड्यावर (पाबरीवर) हात ठेवत पेरणी करत मुठीतलं धान्य भूमातेकडे देत जुन्या आठवणी जाग्या केल्या. ही घटना घडलीय नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्‍यात सोमवारी (ता. चार) दुपारी. 

तब्बल एक महिन्यापेक्षाही अधिक काळापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे नुकसानग्रस्त नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्‍यातील पिकांची पाहणी करुन सोमवारी (ता. चार) नरसीमार्गे बिलोली तालुक्‍यात जात होते. त्यावेळी लोहगाव शिवारात मंत्री महोदयाच्या गाड्याचा ताफा आला असता, रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात एक शेतकरी रब्बीची पेरणी करत होता. जन्मतःच काळ्या आईशी घट्ट नाळ असलेला हा गडी चळवळी अगोदरच्या दिवसांच्या आठवणीमध्ये जात चालत्या गाड्यांचा ताफा थांबवून सोबतच्या लोकांच्या लक्षात येण्याच्या आत थेट शेतातील औत गाठत शेतकऱ्यांकडील धान्य घेऊन चाड्यावर (पाबरीवर) हात ठेवत पेरणी करत मुठीतलं धान्य काळ्या आईच्या कुशीत मोकळे करत जुन्या आठवणी जाग्या केल्या. 

कृषी मंत्री सदाभाऊ खोत आणि त्यांचं काळ्या आईशी असलेलं दृढ नातं कुणाला माहीत नाही.....? रात्रंदिवस स्वतः शेतीत अपार कष्ट करत आपल्या शेतीच्या तुकड्यात काबाडकष्ट करत माणिक मोती पिकवायचा प्रयत्न आयुष्यातील तब्बल पन्नास वर्षे केला. दुग्ध व्यवसायासारखा शेतीला जोडधंदाही केला. पुढे शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना ते रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खात वेळोवेळी रस्त्यावर उतरून मातीत राबणा-या हातांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, हे कोणी ही विसरू शकणार नाही. 

ओल्या दुष्काळाने उध्वस्त झालेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी काढलेल्या दुष्काळी दौ-यात सदाभाऊनी अचानकपणे शेतात जाऊन पेरणी करायला सुरुवात केल्याने उपस्थितांना सुखद धक्का बसला. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार राजेश पवार, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पांडूरंग शिंदे, तहसीलदार सुरेखा नांदे, जिल्हा परिषद सदस्या पूनम पवार, माणिक लोहगावे व इतर पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी उपस्थित होते. 

शेतकरी पुन्हा उभा राहील
मी मंत्री होऊन तीन वर्ष झाली असली तरी त्या अगोदरची 49 वर्षे मी शेता राबलोय. हे संकटाचे दिवस निघून जाऊन या राज्यातला शेतकरी नव्या दमानं, नव्या जोमाने पुन्हा उभं राहून आपल्या चिल्यापिल्यांची काळजी घेईल, असा आशावाद राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com