sadabhau khot about hatkanangle loksabha | Sarkarnama

हातकणंगल्यात बहुजनांचा मेळा, फक्‍त आदेश पाहिजे : सदाभाऊ 

सदानंद पाटील 
मंगळवार, 24 जुलै 2018

खासदार राजू शेटटींना माणसं वापरण्याची सवय आहे. उल्हास पाटील, सदाभाऊ खोत ही त्याची उदाहरणे आहेत. जोपर्यंत तुम्ही त्यांच्याबरोबर असता तोपर्यंत त्यांना काशीतून गंगा स्नान केल्यासारखे आम्ही वाटत होतो. आता बाजूला गेल्यानंतर आम्ही त्यांना किरकोळ वाटू लागलो आहोत.

-सदाभाऊ खोत

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा माझा घरचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदेश दिल्यास कमळ चिन्हावर भाजपमधून निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे, कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

मंत्री खोत म्हणाले, माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची संधी मला गोपीनाथ मुंडे यांनी दिली.त्यावेळीही मी विक्रमी मतदान घेतले. थोडक्‍या मताने मी पराभूत झाला. हातकणंगले तर माझा घरचा मतदारसंघ आहे. माढामध्ये कोणी पावणा-रावळा, मित्र परिवार नसताना ही ताकतीने निवडणूक लढलो. हातकणंगलेत तर पै-पाहुणे, मित्र-परिवार, बहुजनांचा मोठा मेळा आहे. इथून निवडणूक लढण्यात मला काहीच अडचण नाही. मात्र यासाठी मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांनी निवडणूक लढवण्याचे आदेश द्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख