पर्यटनमंत्री जयकुमार रावलांनी सचिन तेंडुलकरला पटवलं!

पर्यटनमंत्री जयकुमार रावलांनी सचिन तेंडुलकरला पटवलं!

धुळे, : क्रिकेटच्या जगतातील अनभिषिक्त सम्राट सचिन तेंडुलकर आता पर्यटन जगताच्या सफरीसाठी सज्ज झाला आहे. मात्र येथे त्याची बॅट धावांसाठी नव्हे तर राज्यभरातील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांनी आकर्षित व्हावे म्हणून तळपणार आहे. राज्याच्या पर्यटनाचा समृद्ध इतिहास तो पर्यटकांना सांगत त्याकडे आकर्षित करणार आहे. राज्यातील पर्यटनस्थळांना भेटी देत त्यांचे वैभव लोकांपुढे व्यापक रूपात मांडणार आहे.

राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्रात पर्यटक वाढीसाठी तसेच पर्यटन स्थळांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा केली. राज्याचे पर्यटनस्थळाचे हे वैभव आपण प्रत्यक्ष भेट देत पाहावे आणि त्याद्वारे त्याचा प्रचार करावा असे साकडे त्यांनी सचिन यांना घालत राज्यातील पर्यटन स्थळांवर भेटी देण्याची विनंती केली.

त्यानुसार सचिन तेंडुलकर लवकरच अजिंठा वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेण्या, कोकणचा समुद्रकिनारा, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती, सारंगखेड्याचा चेतक फेस्टिव्हल, आणि ताडोबा अभयारण्यात पर्यटकांना भेटणार आहे. या भेटीत तो पर्यटकांशी संवाद साधत जास्तीत जास्त लोकांनी पर्यटनासाठी प्रोत्साहित व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जगभरात फिरत असताना राज्यातील पर्यटन स्थळाबाबत इतरांना देखील माहिती देण्याची विनंती मंत्री रावल यांनी केली, त्यालाही सचिन तेंडुलकर यांनी प्रतिसाद देत राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेत लवकरच तेथे भेट देणार असल्याचे आश्वासित केले. सचिन यांनी अर्धा तासाच्या या भेटीत पर्यटनवृध्दीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com