Sachin Sawant Tries his hand in Kitchen | Sarkarnama

सचिन सावंत जेव्हा बिरडं सोलायला बसतात!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोनाच्या काळातील लाॅकडाऊमध्ये काँग्रेस नेते सचिन सावंत यांना बिरडं खाण्याची इच्छा झाली. त्यानंतर काय घडलं हे त्यांनी स्वतःच ट्वीटमध्ये लिहिलं आहे

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लाॅकडाऊन झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिक घरात अडकून पडले आहेत. या कंटाळवाण्या परिस्थितीत वेळ घालवण्यासाठी सर्वच जण काही ना काही मार्ग शोधत आहेत. राजकीय नेतेही याला अपवाद नाहीत. कुणाच्या पुस्तकाच्या कपाटातली पुस्तकं बाहेर पडली आहेत तर कुणी पत्नीला स्वयंपाकघरात मदत करत आहे.

'कोरोना'च्या या दहशतीखाली सुरु असलेल्या 'हाऊस अरेस्ट'मध्ये अनेकांना अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. स्वयंपाक करायला लावणे हे माहित आहे, पण तो करताना अडचणी किती येतात याची जाणीव या काळात अनेकांना झाली आहे. काँग्रेसचे नेते सचीन सावंतही असा एक धडा शिकले आहे. 'लाॅक डाऊन' च्या काळात सचिन सावंता यांना बिरडं (वाल) खाण्याची इच्छा झाली. मग त्यांच्या पत्नीनं त्यांनाल वाल सोलायला लावले. त्यानंतर काय घडलं हे खुद्द सावंत यांनीच आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे...

आपल्या ट्वीटमध्ये सावंत म्हणतात...

.....बिरडं करणे किती कठीण आहे हे बायकोने वाल सोलायला सांगितले तेव्हा कळले.आतापर्यंत फर्मान सोडायचो....(Thinking Face Smily)  पण यातही गुणवर्धन होते बरं! चिकाटी व निरंतरता शिकायला मिळते- संपता संपत नाहीत ते (Worried face Smily) काही असे चाड असतात की त्यांच्याशी झटापट करावी लागते. पुन्हा करायला सांगताना अधिक विचार करावा लागेल (Thinking face Smily)

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख