फडणवीसांनी पाच वर्षात सावरकरांची जयंती, पुण्यतिथी कधी केली?

उद्‌या (ता.26) ला सावरकर यांची पुण्यतिथी असल्याची संधी साधत भाजपने महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याची रणनिती आखली आहे.
sachin sawant criticize bjp on sawarkar issue
sachin sawant criticize bjp on sawarkar issue

मुंबई : महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पुन्हा सावरकर कार्ड खेळण्याची रणनिती आखली असून, उद्‌या (ता.26) ला विधीमंडळात सावरकर गौरव प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे त्याबाबतचा प्रस्ताव दिल्याची माहीती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. मात्र, विधानसभा अध्यक्ष हा प्रस्ताव स्विकारण्याच्या तयारीत नसल्याने उद्‌या विधीमंडळात भारतीय जनता पक्ष आपला मुद्‌दा आक्रमकपणे उपस्थित करून कामकाज रोखण्याचा प्रयत्न करणार असे मानले जाते. 

दरम्यान, सावरकरांचा वापर राजकीय हेतु साध्य करण्याचा केला जात असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी केली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सलग पाच वर्षे सत्तेत असताना त्यांनी कधीही सावरकर यांची जयंती अथवा पुण्यतिथी साजरी केल्याचे आठवत नाही. जर केलीच असेल तर त्यांनी वर्षा या निवासस्थानचे अथवा विधीमंडळातले पुरावे सादर करावेत असे आवाहनच सचिन सावंत यांनी केले आहे. 

उद्‌या (ता.26) ला सावरकर यांची पुण्यतिथी असल्याची संधी साधत भाजपने महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याची रणनिती आखली आहे. मात्र, आतापर्यंत अशा प्रकारचे सावरकर यांच्या गौरवाचा प्रस्ताव कधीही विधीमंडळात मांडण्यात आला नाही, याकडे महाविकास आघाडीचे नेते लक्ष वेधत आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनीही भाजपचा हा प्रयत्न म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने अशी टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com