sachin sathe criticise devendra fadavnis | Sarkarnama

महामंडळ बंद करून फडणवीसांनी मातंग समाजावर अन्याय केला!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

भाजपने आमच्या समाजाचा वापर करून सत्ता मिळवली

सातारा : कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचे कारण पुढे करीत अण्णाभाऊ साठे महामंडळ बंद केले. हा मातंग समाजावर अन्याय आहे. सध्याचे सरकार समाजासाठी कोणतेच प्रयत्न करीत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जातीयवादी असल्याची आमची भावना झाली आहे, अशी टीका मानवहित लोकशाही पार्टीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सचिन साठे म्हणाले, नीरव मोदीने पीएनबी बॅंकेत घोटाळा केला, तरी शासनाने बॅंक सुरू ठेवली आहे. भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करून अण्णाभाऊ साठे महामंडळ बंद केले. भाजपने आमच्या समाजाचा वापर करून सत्ता मिळवली; परंतु सध्या समाजाचे शोषण सुरू आहे. समाजातील मंत्रीही गप्प आहेत.

या वेळी गणेश भगत, संजूबाबा गायकवाड, चंद्रकांत कारके, हरिदास रिटे, राहुल कारके, मारुती खुडे, दादा खवळे आदी उपस्थित होते.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख