सामाजिक जाणिवेतून समाजाची उन्नती साधणारे  तरुण नेतृत्व : सचिन कल्याणशेट्टी 

sachin Kalyanshetty
sachin Kalyanshetty

अक्कलकोट  : अक्कलकोट विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेले अक्कलकोटचे तरुण नेतृत्व सचिन कल्याणशेट्टी यांचे योगदान हे सामाजिक जाणिवेतून समाजाची उन्नती साधणे हेच असल्याचे मागील दहा वर्ष्याच्या कालावधीत केलेल्या कार्यावरून स्पष्ट होते. 


अक्कलकोट विधानसभा क्षेत्रात तरुणांची होत असलेली घुसमट थांबविणे किंबहुना त्यांच्यात भारताची सृजनशील युवा पिढी बनविणे हे ध्येय ठेऊन वाटचाल सुरू केली आहे.यासाठी विवेकानंद प्रतिष्ठान,भारतीय जनता पक्ष, विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था, विवेकानंद मल्टीस्टेट या व इतर अनेक माध्यमातून फक्त समाजातील गरजा ओळखून त्याप्रमाणे काम करण्याची हातोटी आणि त्यासाठी असलेले संघटन कौशल्य आणि युवकांची मजबूत फळी निर्माण या जमेच्या बाजू आहेत.

या व इतर अनेक समाज हिताचे निर्णय घेतल्याने तसेच शांत,मितभाषी व संयमी नेतृत्व याबाबींमुळे तरुण आणि जेष्ठ व्यक्तीत लोकप्रिय ठरले आहेत.आणि विधानसभेचे  उमेदवारी मिळविण्यात खूप संघर्षाची किनार लागूनही त्यांनी नौका उमेदवारी मिळविण्यात यशस्वी ठरली आहे.याबाबत अधिक तपशील सकाळला देताना सचिन कल्याणशेट्टी यांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकी पुढीलप्रमाणे आहेत


आजपर्यंत ३५३ जोडपी विवाहबद्ध 
अक्कलकोट येथील विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यात सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षात एकूण ३५३ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची ज्यांना लग्नाचा खर्च करणे परवडत नाही अश्या जोडप्यांची लग्ने लावून दिली गेली आहेत. विवेकानंद प्रतिष्ठानने याद्वारे सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.लग्न सोहळ्यात वधू वर सर्व आवश्यक साहित्य,वऱ्हाडी मंडळींची जेवणासह सर्व व्यवस्था आदी चोख केली जाते . 


गणेशोत्सव व्याख्यानमाला
मागील आठ दहा वर्ष्यापासून अक्कलकोट तालुक्यातील तरुणांसाठी  दरवर्षी गणेशोत्सव काळात बौद्धिक, ऐतिहासिक, हास्य आदी विविध विषयांवर व्याख्यानमाला आयोजित केली जाते.त्यातून महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रातील दिग्गज अक्कलकोटला येऊन हजेरी लावतात .  या व्याख्यानमालेला या तरुणांची  आणि  महिलांची  मोठी उपस्थिती असते.


तलावातील गाळ काढणे
अक्कलकोट तालुका हा सतत अवर्षणप्रवण क्षेत्रात येतो त्यामुळे पाणी टंचाई सतत जाणवते यासाठी तालुक्यातील अनेक गावाच्या तलावातील गाळ काढून त्याचा पाणी साठा वाढविणे आणि टंचाई दूर करणे तसेच जमिनीची सुपीकता वाढविणे याला प्राधान्य दिले गेले आहे.याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गाव तलाव गाळ काढणे व त्याचे खोलीकरण करणे ही कामे केली जात आहेत.यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

अध्यात्म 

अक्कलकोटला प्रथमच आंतरराष्ट्रीय योग गुरू बाबा रामदेव यांचे तीन दिवसीय योग शिबीर तसेच वळसंग येथे शेतकरी मार्गदर्शन शिबीर घेतले गेले.त्यात तालुक्यातील तरुण आणि इतर वर्ग मोठ्या प्रमाणात योगाकडे वळून त्यांच्या स्वास्थ्याला प्राधान्य मिळत गेले.


विजयपूर येथील सिद्धेश्वर महास्वामी यांचे धार्मिक प्रवचन दोन वर्ष्यापूर्वी श्रावण मासात पूर्ण महिनाभर अक्कलकोटला फत्तेसिंह मैदानावर घेतले गेले.त्याला हजारांच्या संख्येने नागरिक भल्या पहाटे उपस्थित राहून त्याचा लाभ घेतला.यामुळे लोकांत बौद्धिक ज्ञान वाढीस लागला आहे.


रद्दीतून शिक्षण
विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर स्वतःची रद्दी गोळा केली जाते याशिवाय शहरातील नागरिक आपली रद्दी तेथे जमा करतात. वर्षातून  एकदा ही रद्दी विकली जाते आणि त्या आलेल्या पैशातून गरीब व गरजूंना उच्च शिक्षणासाठी मदत केली जाते. त्यामुळे गरिबी ही शिक्षणाला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न केला जातो.


या व असे अनेक उपक्रम राबवितात तरुणांना चांगल्या सवयी लागव्यात,गरजूंना आपली मदत व्हावी,व्यापाऱ्यांना अल्प दरात कर्ज उपलब्ध व्हावा, आरोग्य सुधारावा, ज्ञान वृद्धी व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील राहणार हे तालुक्यातील तरुण नेत्तुत्व आहे.आणि यात आणखी कामे करता यावीत यासाठी विधानसभेवर जाण्याची वाट चोखाळली आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com