निवडणुकीच्या धामधुमीतही पालकमंत्री निलंगेकर रमले कीर्तनात

टाळ-मृदंगाचा आवाज आणि किर्तन सांगणाऱ्या महाराजांचे शब्द कानावर पडताच संभाजी पाटील निलंगेकरांनी गाड्यांचा ताफा थांबवला आणि थेट किर्तन सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन पोहचले.
Sambhaji-Nilangekar.
Sambhaji-Nilangekar.

लातूरः विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा आता अंतिम टप्यात पोहचला आहे. त्यामुळे कमीवेळात अधिकाधिका मतदारांपर्यंत पोचण्याची कसरत उमेदवारांना करावी लागत आहे. त्यात पालकमंत्री म्हटले तर त्यांना स्वःताचा प्रचार करून जिल्ह्यातील इतर उमेदवारांच्या मदतीलाही धावून जावे लागते. अशावेळी थोडीही उसंत मिळणे दुरापास्तच. पण अशा धामधुमीतही पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे पाय किर्तनाकडे वळल्याचे पाहून अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

प्रचारासाठी जात असतांना एका ठिकाणी किर्तन सुरू होते. टाळ-मृदंगाचा आवाज आणि किर्तन सांगणाऱ्या महाराजांचे शब्द कानावर पडताच संभाजी पाटील निलंगेकरांनी गाड्यांचा ताफा थांबवला आणि थेट किर्तन सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन पोहचले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी स्वत: किर्तनात सहभाग नोंदवला आणि आपल्यावर आई-वडीलांनी केलेल्या आध्यात्मिक संस्कारांची ओळख उपस्थितांना करून दिली.

उदगीर येथे एका सभेला निलंगेकर देवणी मार्गे जात होते. मांजराकाठी असणाऱ्या गिरकचाळ या छोट्याशा गावात यावेळी कीर्तनाचा कार्यक्रम सुरु होता. कीर्तनाचे शब्द कानी पडताच पालकमंत्र्यांनी आपला वाहनांचा ताफा गावात वळवण्यास सांगितले. सभेस जाण्याची घाई असतानाही पालकमंत्र्यांचा ताफा गावात थेट कीर्तन सुरु होते तेथे जाऊन थांबला. गाडीतून उतरत निलंगेकर यांनी थेट कीर्तनाचा मंडप गाठला.

अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेनिमित्त तेथे बुलढाणा येथील हभप पुरुषोत्तममहाराज यांचे कीर्तन सुरु होते. पालकमंत्र्यांनी त्यांचे दर्शन घेतले आणि कीर्तन ऐकण्यासाठी मांडी घालून बसले. महाराजांचे कीर्तन ऐकल्यानंतर त्यांनी आपला दौरा उदगीरकडे वळवला. कसलेही निमंत्रण नसतांना आणि प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना निलंगेकरांनी किर्तनाला लावलेल्या हजेरीमुळे गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com