सायकलफेरी काढून ऋतुराज संजय पाटील यांचा अर्ज दाखल

 सायकलफेरी काढून ऋतुराज संजय पाटील यांचा अर्ज दाखल

कोल्हापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मधील राष्ट्रीय कॉंग्रेसचे उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पर्यावरण वाचवण्याचा संदेश देण्यासाठी त्यांनी सायकल रॅलीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कक्षात येऊन आपला अर्ज सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे चुलते व जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील, कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पी एन पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आर के पोवार, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण उपस्थित होते. 
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी श्री पाटील यांच्या कार्यकर्त्यांना ऐतिहासिक दसरा चौकात बोलवण्यात आले होते, तेथून व्हीनस कॉर्नर असेंब्ली रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली त्यात हजारो कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते. रॅलीत श्री पाटील यांच्या कॉंग्रेसच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या या घोषणांनी हा मार्ग दणाणून गेला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com