पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या फेसबुक पेजवरून 'लेकीला सासरी पाठवल्याबद्दल परळीकरांचे आभार 'अशी पोस्ट केली आहे.
बीड जिल्ह्यातील परळीमधून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पराभवाच्या छायेत आहेत. परळीची निवडणूक मुंडे भाऊ- बहीण यांच्यात झाली. प्रचाराच्या अगोदर दोन दिवस धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप पंकजा मुंडे यांच्याकडून करण्यात आला होता. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. या दोन भावाबहिणीच्या वादात रुपाली चाकणकर यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेतली होती. आज पंकजा मुंडे पराभवाच्या छायेत गेल्यावर चाकणकर यांनी "लेकीला सासरी पाठवल्याबद्दल परळीकरांचे आभार"अशी पोस्ट आपल्या फेसबुकवर पोस्ट केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.