rupali chakankar criticizes rahul kul | Sarkarnama

`राहुल कुल यांच्या घरात माणसं तीन आणि पक्ष चार!`

अमर परदेशी
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

वरवंड : आमदार राहुल कुल यांच्या घरात पक्ष किती आहेत? तीन माणस अन चार पक्ष! जिकड भेळ तिकड खेळ, अशी त्यांची अवस्था आहे, अशी टिका राष्ट्रवादीच्या महीला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली.

राष्ट्रवादीचे महाआघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्राचारार्थ वरवंड (ता.दौंड) येथील सभेत चाकणकर बोलत होत्या.

चाकणकर यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर चांगलीच आगपाखड केली.त्या म्हणाल्या,दौंड तालुका माझे माहेर आहे. तालुक्याचा काय विकास केला.हे सांगायला दिल्लीवरुन लोक आय़ात केली जातात. आमदारांनी तालुक्यातील एका तरुणाला तरी नोकरी लावली का? यापुढे त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका.पोलिसी खाक्या दाखवत तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना धमकावीत आहे. यापुढे असा प्रकार खपुन घेतला जाणार नाही.

या सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना राज्यात मोठया प्रमाणात पोलिस भरती झाली. पण सध्याच्या गृहमंत्र्यांच्या काळात किती पोलिस भरती झाली, याचा विचार पण केला पाहीजे.यंदा पावसात अनेकदा पुणे तुंबले. तुम्ही स्मार्ट सिटी करु शकत नाही.त्यामुळे सरकारने विकासाच्या गप्पा मारू नयेत. सरकारच्या शेती विरोधी धोरणाचा शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे.महीलांवरील आत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. या सरकारच्या काळात महीला असुरक्षित आहेत, अशी टीका त्यांनी केली.

यावेळी पांडुरंग मेरगळ यांनीही त्यांच्या खास शैलीत विरोधांवर टिकास्त्र सोडले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख