खासदार संजय राऊत, छगन भुजबळांच्या भेटीच्या अफवेने उडाली धावपळ! 

विधानसभा निवडणुकीच्या तयारीत सर्वच नेते सध्या व्यग्रआहेत. यासंदर्भात शिवसेनेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील सर्व पंधरा मतदारसंघांच्या पदाधिकारी, इच्छुकांशी चर्चा करुन ते निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत. या बैठकीपूर्वी नियोजित नसतांना खासदार राऊत सकाळी अकराला भुजबळ फार्म नजीक बडदे नगर येथे शिवसेना नगरसेवकाच्या प्रभागात एका महापालिका शाळेत कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी खासदार राऊत जाणार होते.
Rumour in Nashik about Chagan Bhujbal and Sanjay Raut Meeting
Rumour in Nashik about Chagan Bhujbal and Sanjay Raut Meeting

नाशिक : "शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी भुजबळ फार्म येथे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली.' अशी बातमी कर्नोपकर्णी शहरात पसरली. काही वाहिनीच्या पत्रकारांनीच एकमेकांना ही माहिती देत 'लवकर चला, लवकर चला' असे सांगत कॅमेरे, बुम सरसावत भुजबळ फार्मवर धाव घेतली. सर्व भुजबळ फार्मवर पोहोचले खरे पण तिथे मात्र सर्व सामसुम होती. तासभर ताटकळल्यानंतर कळले की अशी काही भेटच होणार नव्हती. त्यात पत्रकारांची मात्र नाहक ओढाताण झाल्याने या अफवेने चांगलीच गंमत घडली. 

विधानसभा निवडणुकीच्या तयारीत सर्वच नेते सध्या व्यग्र आहेत. यासंदर्भात शिवसेनेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील सर्व पंधरा मतदारसंघांच्या पदाधिकारी, इच्छुकांशी चर्चा करुन ते निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत. या बैठकीपूर्वी नियोजित नसतांना खासदार राऊत सकाळी अकराला भुजबळ फार्म नजीक बडदे नगर येथे शिवसेना नगरसेवकाच्या प्रभागात एका महापालिका शाळेत कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी खासदार राऊत जाणार होते. काही पत्रकारांना ही माहिती मिळाल्यावर भुजबळ फार्म असा उल्लेख आल्याने त्यांची उत्सुकता जागी झाली. 

या बातमीला नक्कीच 'बातमी मुल्य' असल्याने झटपट व्हाटस्‌ऍप, फोन याद्वारे एकमेकांना निरोप देत सगळे तिकडे धावले. सर्वजण गेटवर बुम सावरत उभे राहिले. भुजबळ फार्म येथे मात्र सामसुम होती. कारण माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. भुजबळ येवल्याला आणि संजय राऊत नाशिकला त्यांची भेट होणार तरी कशी. मात्र, अनेकांना या दोन्ही नेत्यांचे लोकेशन कळण्यासाठी मोठा कालावधी जावा लागला. त्यात झालेली धावपळ अन्‌ त्यामुळे मनोरंजन झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com