शिवसेनेचे नगरसेवक गोडसेंनी महासभेत कुंडी फोडल्याने भाजप-शिवसेनेत राडा

जय भवानी रोड परिसरात पिण्याचे पाणी मिळत नाही. यावर बोलण्याची परवानगी महापौर रंजना भानसी यांनी नाकारली. त्यामुळे शिवसेना -भाजप नगरसेवकांत राडा झाला.
Nashik Corporation Ruccus Between BJP Sena Corporators
Nashik Corporation Ruccus Between BJP Sena Corporators

नाशिक  : जय भवानी रोड परिसरात पिण्याचे पाणी मिळत नाही. यावर बोलण्याची परवानगी महापौर रंजना भानसी यांनी नाकारली. त्यामुळे शिवसेना -भाजप नगरसेवकांत राडा झाला.

महापौर भानसी यांनी सभा शास्त्राचे नियम धुडकावले असा आरोप करीत शिवसेनेने भाजपला घेरले. या गोंधळामुळे सभा सुरू करताना महापौर भानसी मेटाकुटीला आल्या. दोन्ही बाजूंची नगरसेवक एकमेकांवर धाऊन जात आरडाओरडा करीत राहिले.

सभा सुरू होताच नगरसेवकांनी आपल्या भागातील समस्यांना वाट करून दिली. जय भवानी रोड परिसरात पाणी नसल्याने या विषयावर बोलू न दिल्याने शिवसेनेचे नगरसेवक सुनिल गोडसे यांनी माठ फोडून केला निषेध, फुटलेल्या मठाचे तुकडे नगरसेविका वर्षा भालेराव यांना लागल्याने भाजप नगरसेविकांचा गोंधळ, सुरू झाला. अखेर महापौरांनी महासभा तहकूब केली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com