आरटीओतील 128 निरीक्षकांच्या पदोन्नतीच्या फायली दिवाकर रावते यांच्याकडे पडून 

वर्ष 1999, 2004, 2007, 2011 व 3013 यादरम्यान तीन वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा 27 सहायक मोटार वाहन निरीक्षकांना तीन वर्षे सेवेनंतर पदोन्नती दिली आहे; मात्र त्यानंतर आता 128 अधिकाऱ्यांची पदोन्नती रखडली आहे.
Diwakar Raote
Diwakar Raote

मुंबई  :  उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या पदोन्नतीचा तिढा अजूनही सुटलेला नाही. यासंदर्भात परिवहन सचिव आशिष कुमार सिंह यांनी सकारात्मक भूमिका घेत पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली असली, तरी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अंतिम मान्यतेअभावी  128 सहायक मोटार वाहन निरीक्षकांची पदोन्नती प्रलंबित आहे.

आरटीओ विभागात आधीच अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे वाहन योग्यता तपासणी, भरारी पथकातील दंडात्मक काम, दुचाकी-चार चाकी परवाने, वाहनांची फिटनेस तपासणी यासह इतरही कामे प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. 2013 पासून अनेक पदे रिक्त असल्याने एकाच पदावर असलेल्या अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. त्यातही मोटार वाहन निरीक्षक यांना सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर पदोन्नती दिली जात आहे.

 परिणामी, सहायक मोटर वाहन निरीक्षक पदावरील उमेदवारांनासुद्धा किमान तीन वर्षांच्या सेवेनंतर मोटार वाहन निरीक्षकांच्या पदावर पदोन्नती देण्याची मागणी सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी केली आहे. यासंदर्भात परिवहन विभागाचे परिवहन सचिव आशिष कुमार सिंह यांना प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही; तर उपसचिव साबळे यांनी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.

पुणे येथील श्रीकांत कर्वे यांच्या 2013 च्या याचिकेवरून उच्च न्यायालयानेही 7 ऑगष्ट 2018 रोजी, पदोन्नती करण्याचे आदेश दिले आहे. तरी अद्याप पदोन्नती प्रक्रियेला अंतिम मान्यता मिळाली नसल्याने 128 सहायक मोटार वाहन निरीक्षकांची पदोन्नती रखडली असल्याचे दिसून येत आहे. परिवहन विभागाच्या सेवा कायद्यात पाच वर्षांनंतर पदोन्नती देण्याचा कायदा आहे; मात्र नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार परिवहन आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात किमान तीन वर्षे सेवा देणाऱ्या सहायक मोटार वाहन निरीक्षकांना पदोन्नती देण्याची तरतूद आहे.

परिवहन सचिवांना पदोन्नतीला मान्यता देत, पसंतीक्रमसुद्धा सहायक मोटार वाहन निरीक्षकांकडून मागितला आहे. त्याप्रमाणे छाननी होऊन, सामान्य प्रशासन विभागाने विभाग वाटपसुद्धा केले आहे; मात्र फाईल अंतिम मान्यतेसाठी प्रलंबित आहे. निवडणूक आचारसहिंतेमुळे दिवाकर रावते या फायलींवर २३ मे पर्यंत सह्या करण्यास तयार नसल्याचे समजते . 


वर्ष 1999, 2004, 2007, 2011 व 3013 यादरम्यान तीन वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा 27 सहायक मोटार वाहन निरीक्षकांना तीन वर्षे सेवेनंतर पदोन्नती दिली आहे; मात्र त्यानंतर आता 128 अधिकाऱ्यांची पदोन्नती रखडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com