RTO officers suspended | Sarkarnama

राज्यातील 16  आरटीओ निलंबित

सरकारनामा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

मुंबई : राज्य परिवहन विभागाने (आरटीओ) मुंबई परिवहन आयुक्त कार्यालयातील उपायुक्त भालचंद्र यांच्यासह एकूण 16 अधिकाऱ्यांना निलंबित केले. 

मुंबई : राज्य परिवहन विभागाने (आरटीओ) मुंबई परिवहन आयुक्त कार्यालयातील उपायुक्त भालचंद्र यांच्यासह एकूण 16 अधिकाऱ्यांना निलंबित केले. 

वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देताना अनियमितता झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पुण्यातील श्रीकांत कर्वे यांनी उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका केली होती. या प्रकरणी यापूर्वी 37 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.

कर्वे यांनी 2013 मध्ये याचिका दाखल केली होती. त्यांनतर उच्च न्यायालयाने यावर सुनावणी देत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते; मात्र राज्य परिवहन विभागाकडून टाळाटाळ होत असल्याचे पाहून परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरच कारवाई का केली जाऊ नये, असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. 

उच्च न्यायालयात नियमित सुनावणी सुरू असतानाही महत्त्वाची कारवाई होत नसल्याने कर्वे यांनी "सिव्हिल' अर्ज केला होता. त्यावरून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचा ठपका उच्च न्यायालयाने स्वतः या अधिकाऱ्यांवर ठेवला. त्यामुळे 'आरटीओ'ने 16 अधिकाऱ्यांना निलंबित केले.

दरम्यान, याचिकाकर्ते श्रीकांत कर्वे यांनी याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने व्हिडीओ तपासणीसाठी एकसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती; मात्र उच्च न्यायालयाला चुकीचा अहवाल सादर केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या समितीचे सदस्य व मुंबई परिवहन आयुक्त कार्यालयातील उपायुक्त भालचंद्र यांना निलंबित करण्यात आले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख