आरएसएस शिवसेनेशी पुन्हा संपर्क करतंय, पण ... 

आरएसएस कडून आपल्याला वेगवेगळे प्रस्ताव येत असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना दिल्याचे कळते .
shivsena_thakrey
shivsena_thakrey

मुंबई  : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'द ललित' हॉटेल मधील आपल्या आमदारांची भेट घेऊन बैठक घेतली. बैठकीत शिवसेना आमदारांना सुरू असलेल्या राजकिय घडामोडींबद्दल माहिती देत 'घाबरून जाऊ नका,सरकार आपलंच येणार' असा विश्वास व्यक्त केल्याचे समजते.

आरएसएसच्या माध्यमातून आपल्याला संपर्क करण्याचा प्रयत्न होतोय.  मात्र आता खूप उशीर झाला असल्याचे उद्धव ठाकरेंनी आमदारांना सांगितल्याची माहिती मिळत आहे.

आरएसएस आपल्याला पुन्हा संपर्क करतंय.त्यांच्याकडून आपल्याला वेगवेगळे प्रस्ताव येत असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना दिल्याचे  कळते .पण आता खुप उशीर झालाय.काहीही झाले तरी भाजपसाठीचे दरवाजे आपण बंद केले असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले असल्याचे समजते . 

भाजपने फोडाफोडीचे राजकारण सुरू केलेय.त्याचा काहीही उपयोग होणार नाही.याविरोधात आपण तीनही पक्ष एकत्र येऊन मिळून लढत आहोत.शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते आपल्यासोबत ठाम उभे आहेत त्यामुळे चिंता करायची गरज नाही.यामुळे चिंता करायची गरज नसल्याचेही उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना सांगितले असल्याची माहिती मिळतेय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com