RSS Chief Mohan Bhagwat Reaction on Rammandir Verdict | Sarkarnama

राममंदिराच्या निर्णयाकडे जय-पराजय अशा दृष्टीकोनातून पाहू नका : सरसंघचालक

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

जय-पराजय म्हणून पाहिले जाऊ नये. या सत्य व न्यायाच्या मंथनातून आलेल्या या निर्णयाला देशाची एकात्मता राखणारा व बंधुता ठेवणारा निर्णय म्हणून पाहिले जावे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 

नवी दिल्ली : जय-पराजय म्हणून पाहिले जाऊ नये. या सत्य व न्यायाच्या मंथनातून आलेल्या या निर्णयाला देशाची एकात्मता राखणारा व बंधुता ठेवणारा निर्णय म्हणून पाहिले जावे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 

ते म्हणाले, " सर्वोच्च न्यायालयाने देशाची जनभावनी, आस्था व श्रद्धेला न्याय देणाऱ्या दिलेल्या निर्णयाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वागत करतो. हा विधीसंमत अंतीम निर्णय आहे. रामजन्मभूमीशी संबंधित सर्व पैलूंचा सखोल विचार झाला आहे.  सर्व पक्षांनी आपापल्या परीने ठेवलेल्या मुद्द्यांचा यात विचार केला गेला. सत्य व न्यायाची चाड ठेवणारे सर्व न्यायमूर्ती व सर्व पक्षकारांच्या वकिलांचे मी अभिनंदन करतो. या लांबलचक प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व संघटना व या लढ्यात बलिदान देलेल्यांचे मी स्मरण करतो.''

ते पुढे म्हणाले, "कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जे प्रयत्न झाले त्याचेही आम्ही स्वागत करतो. संयमपूर्वक न्यायाची वाट पाहणारी जनताही अभिनंदनाला पात्र आहे. याकडे जय-पराजय म्हणून पाहिले जाऊ नये. या निर्णयाकडे सत्य व न्यायाच्या मंथनातून आलेल्या या निर्णयाला देशाची एकात्मता राखणारा व बंधुता ठेवणारा निर्णय म्हणून पाहिले जावे. मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी अत्यंत संयमाने आपला आनंद व्यक्त करावा. परस्पर वाद मिटवणारी पावले सरकारकडून लवकर उचलली जातील हा आम्हाला विश्वास आहे,''  झालेल्या सर्व गोष्टी विसरुन आपण भव्य राममंदीर निर्माणासाठी आपण सर्व प्रयत्न करुयात, असे आवाहनही त्यांनी केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख