rss | Sarkarnama

सरसंघचालकांना डी. एससी. 

सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 10 मार्च 2017

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने (माफ्सू) डी. एससी. पदवी दिली आहे. प्रकृती
ठीक नसतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारंभाला उपस्थित राहिले. 

राज्यपाल व कुलपती सी. विद्यासागर राव यांनी डॉ. भागवतांना डी. एससी. पदवी बहाल केली. स्वतः भागवत हे पशुवैद्यकीय पदवीधर आहेत. यामुळे "माफ्सू'ने डॉ.
भागवतांना डी. एससी. देण्याचा निर्णय घेतला, असा दावा केला जात आहे. यात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा यांची मोठी भूमिका असल्याचे बोलले
जात आहे. डॉ. आदित्यकुमार मिश्रा यांची मुदत येत्या सप्टेंबर महिन्यात संपणार आहे. कुलगुरुपदाची पुन्हा मुदतवाढ हवी असल्यास तो मार्ग रेशीमबागेतून जातो,
एवढे किमान ज्ञान डॉ. मिश्रा यांना तर नक्कीच मिळाले असेल, हे सांगणे न लगे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख