rsp supports rahul kul in dound | Sarkarnama

कुलांनी `कमळ` घेतले तरी रासपचा पाठिंबा त्यांनाच!

रमेश वत्रे
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

केडगाव ः आमदार राहुल कुल यांनी विधानसभा निवडणुकीत कमळ चिन्ह घेतल्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने नाराजी दूर झाल्यानंतर कुल यांना पाठिंबा दिला. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस तोंडघशी पडली आहे, अशी टीका भीमा कारखान्याचे संचालक अप्पासाहेब हंडाळ व माजी संचालक लक्ष्मण रांधवण यांनी केली आहे.

केडगाव ः आमदार राहुल कुल यांनी विधानसभा निवडणुकीत कमळ चिन्ह घेतल्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने नाराजी दूर झाल्यानंतर कुल यांना पाठिंबा दिला. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस तोंडघशी पडली आहे, अशी टीका भीमा कारखान्याचे संचालक अप्पासाहेब हंडाळ व माजी संचालक लक्ष्मण रांधवण यांनी केली आहे.

कुल यांनी कमळ चिन्ह घेतल्यामुळे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी जानकर यांच्या समर्थनार्थ कुल यांच्यावर टीका केली होती. रासपचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीला राष्ट्रवादीने हवा देण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीने रासपमधील धनगर पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत त्यांना राष्ट्रवादीकडे वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही.

याबाबत रासपचे जिल्हाध्यक्ष हरीश खोमणे व तालुकाध्यक्ष तानाजी केकाण, युवक अध्यक्ष अमोल मारकड म्हणाले, ""रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्याशी या संदर्भात चर्चा झाली असून, त्यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र आम्हाला दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रतिनिधित्व देणे व निर्णय प्रक्रियेत दौंड रासपला सामावून घेणे या मागण्या कुल यांनी मान्य केल्या आहेत. त्यामुळे काल पाटसमध्ये दौंड रासपची बैठक झाली त्यात सर्वानुमते कुल यांना पाठिंबा देण्याचे ठरले. राष्ट्रवादीने आम्हाला फोडण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र आम्ही महायुती बरोबर राहणार आहे.''

रासपचे दादा केसकर म्हणाले, ""केंद्रात व राज्यात सत्ता असतानाही कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने धनगर समाजाला फक्त झुलवत ठेवले. आरक्षणातील खरा अडसर राष्ट्रवादी कॉंग्रेस आहे.'' बोरीभडकचे माजी सरपंच दशरथ कोळपे म्हणाले, ""थोरात यांनी संयम बाळगायला पाहिजे होता. मात्र उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असे थोरात यांचे काम आहे.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख