ऱासपचा बारामती, दौंड, इंदापूर, भोर व शिरूरवर दावा : कुल काय करणार?

ऱासपचा बारामती, दौंड, इंदापूर, भोर व शिरूरवर दावा : कुल काय करणार?

बारामती शहर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, भोर व शिरूर या पाच मतदारसंघाची मागणी केली आहे. रासपची गुरुवारी पुण्यात बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शेळी मेंढी विकास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतल्ले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हा अध्यक्ष संदीप चोपडे, राज्याचे उपाध्यक्ष अजित पाटील, दादासाहेब केसकर, माणिकराव दांगडे पाटील, अण्णासाहेब रूपनवर, मणेर काझी, नितीन धायगुडे, श्रद्धा भामंब्रेकर, लक्ष्मण हाके उपस्थित होते. 

कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील बरीच नेतेमंडळी रासपच्या संपर्कात असल्याचेही या वेळी सांगितले गेले. दौंडसह बारामती, इंदापूर, भोर व शिरूर या मतदारसंघात पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत आहे. त्यामुळे या मतदारसंघावर आम्ही दावा सांगत आहोत, असे संदीप चोपडे यांनी सांगितले. दौंडमध्ये तर पक्षाचा आमदार आहे व इतर मतदारसंघातही रासपची ताकद तुलनेने अधिक असल्याने भाजप-सेना युतीकडे या मतदारसंघाची मागणी करण्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्फत करण्याचे आजच्या बैठकीत निश्‍चित झाले. 

दौंडची जागा सध्या रासपकडे आहे. विद्यमान आमदार राहुल कुल हे रासपच्या कि भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणार,याची उत्सुकता आहे. त्यांच्या पत्नी कांचन यांनी भाजपच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढविली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com