Rs 30 lakh cash seized in Dound | Sarkarnama

निवडणूक पथकाकडून तीस लाखांची रोकड दौंडमध्ये जप्त

प्रफुल्ल भंडारी
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

दौंड (पुणे) : सोनवडी (ता. दौंड) येथे निवडणूक आयोगाच्या स्थिर पथकाने एका चारचाकी वाहनातून तीस लाख रूपयांची रोकड जप्त केली आहे. सदर रक्कम नगर जिल्ह्यातील एका पतसंस्थेची असल्याचा दावा करण्यात आल्याने त्याची शहानिशा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

दौंड विधानसभा निवडणूक आचारसंहित पथकाचे प्रमुख तथा दौंडचे गट विकास अधिकारी गणेश मोरे यांनी या बाबत माहिती दिली. आज (ता. १०) दौंड - नगर रस्त्यावर सोनवडी येथील जुन्या टोल नाक्याजवळ दुपारी निवडणूक आयोगाचे स्थिर पथक प्रमुख के. ए. काजळे यांनी ही कारवाई केली.

दौंड येथून काष्टीच्या दिशेने जाणार्या एका इनोव्हा वाहनाची तपासणी करीत असताना त्यामध्ये तीस लाख रूपयांची रोकड आढळून आली. रोकड घेऊन जाणार्यांनी सदर रक्कम काष्टी (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील धन्वंतरी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेची असल्याचा दावा केला. त्याचबरोबर सदर रोकड दौंड शहरातील अॅक्सिस बॅंकेतून काढल्याची माहिती पथकाला दिली. पंरतु पथकाला शंका आल्याने त्यांनी पंचनामा करीत सदर रक्कम जप्त केली आहे. सदर रकमेविषयी प्राप्तिकर विभागाला कळविण्यात आले असून त्यांच्याकडून पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती गणेश मोरे यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्कम सापडल्याने आणि निवडणूक अधिकार्यांनी ती जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख